Agriculture News in Marathi Struggling for crop damage complaints | Page 4 ||| Agrowon

पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची तक्राररूपी माहिती उपलब्ध पर्यायांच्या माध्यमातून विमा कंपनीपर्यंत पोहोचविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची तक्राररूपी माहिती उपलब्ध पर्यायांच्या माध्यमातून विमा कंपनीपर्यंत पोहोचविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. या धडपडीत कुणाची तक्रार नोंद तर कुणाचा फक्त वेळ तक्रार नोंदविण्यासाठीच्या प्रयत्नात जात असल्याचे चित्र आहे. 

अनेक जिल्हास्तरांवरून तालुकास्तरावर कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत वेळेत पीक नुकसानीच्या तक्रारीसाठी शेतकऱ्यांच्या सोयीकरिता पर्यायांची मेसेज पाठविले जात आहेत. त्यामध्ये तालुका कृषी कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार होत नसेल तर ऑफलाइन तक्रार करण्याची सोय सुचविण्यात आली आहे.

प्रत्यक्षात काही तालुक्यांमध्ये अशाप्रकारे ऑफलाइन तक्रारच स्वीकारली जात नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे काही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कृषी सहायकांना नुकसानीचे पंचनामे करतानाच शेतकऱ्यांची तक्रारही ऑनलाइन करण्यासाठी ऑफलाइन नोंदवून घेण्याची सूचना केल्याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनीच दिली. पुन्हा एकदा झालेल्या पीक नुकसानीची माहिती ऑनलाइन व ऑफलाइन देण्याचा गडबडगुंडा सुरू झाला आहे.

त्यातील शेतकरी सांगत असलेल्या अडचणी व अनेक शेतकऱ्यांना माहितीचा असलेला अभाव पाहता शेतकरी वेळेत नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनी पर्यंत पोहोचू शकतील का, वेळेनंतर नंतर येणाऱ्या तक्रारींची दखल विमा कंपन्या घेतील का व त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल का, आदी प्रश्‍न यानिमित्ताने शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

प्रतिक्रिया
आमच्या गावातील दहा ते बारा जण ऑनलाइन करत होते. एकाच पण ऑनलाइन तक्रार दाखल झाली नाही. गावातील काल चार ते पाच जणांनी तीन ते सातपर्यंत ऑनलाइन करत होते ते पण झाले नाही. ७२ तासांची वेळ वाढवून द्यायला पाहिजे. 
- संदीप लोंढे, 
शेतकरी, शेवगळ, जि. जालना 

.प्रतिक्रिया
टोल फ्री नंबर लागत नाही. तालुक्यातील प्रतिनिधी म्हणतात, ऑनलाइन तक्रार करा आणि कंपनीचे ॲप चालत नाही. अधिकारी व कर्मचारी म्हणताय ऑफलाइन अर्ज करू नका ऑनलाइन अर्ज सादर करा. अशा वेळेस काय करावे सुचत नाही. नुकसान तर झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा कोण देणार. 
- ईश्‍वर सपकाळ, 
शेतकरी, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद 

प्रतिक्रिया

सहा ते सात तास सतत प्रयत्न केल्यानंतर टोल फ्री क्रमांक लागला माहिती नसलेल्या शेतकऱ्याला त्यावर इतके बटनं दाबलं अन् नंतर विचारलेले माहिती आकडे दिन जमल असं वाटत नाही माझ्या या कुटुंबातील आणखी दोन नुकसानग्रस्त खात्याची माहिती देणे बाकी आहे. 
-सदाशिव गिते 
देवगाव ता. पैठण, जि. औरंगाबाद 
...  

 
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...