यवतमाळमध्ये रखडले दोन डझन सिंचन प्रकल्प

यवतमाळ ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचनाचा अनुशेष वाढीस लागला आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, दोन मध्यम आणि तब्बल २३ लघू प्रकल्प रखडले आहेत.
Stuck in Yavatmal Two dozen irrigation projects
Stuck in Yavatmal Two dozen irrigation projects

यवतमाळ ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचनाचा अनुशेष वाढीस लागला आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, दोन मध्यम आणि तब्बल २३ लघू प्रकल्प रखडले आहेत. यातील निम्न पैनगंगा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी आता दहा हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे. 

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाचे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिगाव प्रकल्प त्यानंतर बहुतांशी मार्गी लागला. मात्र निम्न पैनगंगा प्रकल्पाचे ग्रहण आजवर सुटू शकले नाही. या शिवाय बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. याच पद्धतीने दोन मध्यम प्रकल्पही निधीअभावी थांबले आहेत. २३ लघूप्रकल्पांनाही निधीची प्रतिक्षा कायम आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात जे प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्याद्वारे एकूण क्षमतेच्या १८ टक्‍केच सिंचन होत आहे. कोट्यावधीचा खर्च करूनही सिंचन सुविधांत अपेक्षीत वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. टाकळी  डोल्हारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधीअभावी थांबला. 

    चार हजार १७४ हेक्‍टरवर सिंचन वाढणार

जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी छोट्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच पहूर, दहेगाव, वरुड येवती, आंतरगाव, कोहळा आणि महागाव या सहा प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर चार हजार १७४ हेक्‍टरवर सिंचन वाढणार आहे. मात्र त्यासाठीचा निधी अजूनही उपलब्ध झाला नाही. निम्न पैनगंगा प्रकल्प सुरुवातीला ५०० कोटी रुपयांचा होता. त्याची किंमत आता दहा हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. हा प्रकल्प झाल्यास दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. 

शेतीला नुसती सिंचनाची सोय झाल्यास अनेक समस्या सुटतील. परंतु शेतकरी आत्महत्यांचे राजकारण करून त्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व  टिकविण्याची धडपड असलेले लोकप्रतिनिधी यासाठी उत्साही नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांसमोरील प्रश्‍न कायम राहणार आहेत.  - मनीष जाधव, शेतकरी नेते, वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com