agriculture news in marathi Stuck in Yavatmal Two dozen irrigation projects | Agrowon

यवतमाळमध्ये रखडले दोन डझन सिंचन प्रकल्प

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

यवतमाळ ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचनाचा अनुशेष वाढीस लागला आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, दोन मध्यम आणि तब्बल २३ लघू प्रकल्प रखडले आहेत.

यवतमाळ ः जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंचनाचा अनुशेष वाढीस लागला आहे. जिल्ह्यातील दोन मोठे, दोन मध्यम आणि तब्बल २३ लघू प्रकल्प रखडले आहेत. यातील निम्न पैनगंगा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी आता दहा हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे. 

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाचे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिगाव प्रकल्प त्यानंतर बहुतांशी मार्गी लागला. मात्र निम्न पैनगंगा प्रकल्पाचे ग्रहण आजवर सुटू शकले नाही. या शिवाय बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्‍यकता आहे. याच पद्धतीने दोन मध्यम प्रकल्पही निधीअभावी थांबले आहेत. २३ लघूप्रकल्पांनाही निधीची प्रतिक्षा कायम आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात जे प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्याद्वारे एकूण क्षमतेच्या १८ टक्‍केच सिंचन होत आहे. कोट्यावधीचा खर्च करूनही सिंचन सुविधांत अपेक्षीत वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. टाकळी 
डोल्हारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता आणि निधीअभावी थांबला. 

   चार हजार १७४ हेक्‍टरवर सिंचन वाढणार

जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी छोट्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच पहूर, दहेगाव, वरुड येवती, आंतरगाव, कोहळा आणि महागाव या सहा प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर चार हजार १७४ हेक्‍टरवर सिंचन वाढणार आहे. मात्र त्यासाठीचा निधी अजूनही उपलब्ध झाला नाही. निम्न पैनगंगा प्रकल्प सुरुवातीला ५०० कोटी रुपयांचा होता. त्याची किंमत आता दहा हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. हा प्रकल्प झाल्यास दीड लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. 

शेतीला नुसती सिंचनाची सोय झाल्यास अनेक समस्या सुटतील. परंतु शेतकरी आत्महत्यांचे राजकारण करून त्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व  टिकविण्याची धडपड असलेले लोकप्रतिनिधी यासाठी उत्साही नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांसमोरील प्रश्‍न कायम राहणार आहेत. 
- मनीष जाधव, शेतकरी नेते, वागद, ता. महागाव, जि. यवतमाळ.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...