कृषी परिषदेसमोर पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ठिय्या

student agitation
student agitation

पुणे ः कृषी पदव्युत्तर पदवीला पूर्ववत व्यावसायिक दर्जा मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर मंगळवारपासून (ता. २५) ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  या आंदोलनात सागर कारंडे, आकाश गरूड, अक्षय पाटील, सोनी लाड, जयदीप शिरसाठ, उमेश सरोदे, उमेश भोसले, प्रदीप काकडे यांच्यासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.   आकाश गरूड म्हणाले की, कृषी पदव्युत्तर पदवीला २०१८ पर्यंत व्यावसायिक दर्जा होता. त्यानंतर व्यावसायिकतेचे निकष पूर्ण करून देखील शासनाने २०१८ मध्ये व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा काढून टाकला. आमची एवढीच मागणी आहे, की शासनाने पुन्हा पूर्ववत व्यावसायिक दर्जा आणावा. बंद केलेल्या सर्व शिष्यवृत्त्या पूर्ववत चालू कराव्यात. त्यासाठीच आम्ही आंदोलन केले आहे.   कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले, की या विषयाची दखल घेऊन माननीय कृषिमंत्री महोदयांनी नुकतीच २० फेब्रुवारी मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रधान सचिव, कृषी परिषदेचे संचालक उपस्थित होते. त्या वेळी कृषिमंत्री यांनी संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना सूचना देत सकारात्मक व नियमामध्ये राहून निर्णय घेण्याची कार्यवाही करण्याची सूचना दिल्या आहेत. कृषी पदवीच्या धर्तीवर कृषी पदव्युत्तर पदवीलाही तांत्रिक दर्जा द्यावा ही मुख्य मागणी आहे. यासाठीच परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने मुंबईला गेले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com