‘माफसू’च्या विद्यार्थ्यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम

विद्यार्थी
विद्यार्थी

नागपूर ः दहावी उत्तीर्ण पशुधन सहायकांना थेट डॉक्‍टर म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप पशुविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. हा निर्णय दोन दिवसांत मागे न घेतल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषदेच्या कुलसचिवांना दिला.  दहावी उत्तीर्ण केल्यानंतर दोन वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पशुधन सहायकांना वीस वर्षानंतर थेट पशुधन पर्यवेक्षक (वर्ग २) या पदावर पदोन्नती दिली जाते. बीव्हीएससी अभ्यासक्रम आणि त्यानंतर नीट प्रवेश परीक्षा देत तब्बल साडेसात वर्ष शिक्षणावर खर्ची घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप आहे. पशुधन सहायक म्हणजे कंपाउंडर, त्यांना डॉक्‍टर म्हणून नेमणूक कोणत्या आधारावर दिली जाते, याला आपला विरोध असल्याचे महाराष्ट्र पशुविद्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. तेजस वानखडे यांनी सांगितले.  याचा विरोध करण्यासाठी गुुरुवारी (ता. १४) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात धाव घेतली. कार्यालयात कोणीच नसल्याने रिकाम्या खुर्च्यांवर मेणबत्ती लावण्यात आली आणि हारही घालण्यात आला. दोन दिवसात या विषयावर बैठक बोलावीत तोडगा न काढल्यास पुढील आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र असेल, अशा इशाराही दिला गेला आहे. महाराष्ट्र पशुवैद्यक शाखेच्या कुलसचिवांनी या वेळी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले.  मग त्या परिचारिकांना पण डॉक्‍टर म्हणा खासगी आणि सरकारी रुग्णालयात अनेक नर्स (परिचारिका) अनेक वर्षांपासून काम करतात. त्यांना आजवर डॉक्‍टरचा दर्जा का दिला गेला नाही? मानवी आरोग्याची काळजी घेतली जात असेल तर जनावरांच्या आरोग्याची काळजी का नाही? असा प्रश्‍नही डॉ. तेजस वानखडे यांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com