agriculture news in Marathi student will get home learning Maharashtra | Agrowon

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शिक्षण 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया घरी सुरू राहावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने गृह अध्ययन आराखडा तयार करण्यात आला आहे.

पुणे : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया घरी सुरू राहावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने गृह अध्ययन आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांमार्फत घर बसल्या शिक्षण मिळणार आहे, सोशल मेडियाच्या माध्यमातून वर्ग शिक्षकांमार्फत या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शाळा बंद आहेत, तसेच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात येऊन शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थी घरीच राहणार आहेत. या काळात त्यांची अध्ययन प्रक्रीया सुरू राहण्याच्या दुष्टीने जिल्हा परिषदेने गृह अध्ययन प्रकल्पाअंतर्गत आराखडा तयार केला आहे.

विद्यार्थ्यांनी २०१९-२० वर्षातील अभ्यासक्रमाचा सराव पुर्ण केल्यानंतर पुढील वर्षामध्ये येणाऱ्या विषयांची पुर्वतयारी होईल, अशा अभ्यासक्रमाचा यात समावेश करण्यात आला आहे. शाळेतील सर्व शिक्षणकांमार्फत त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत सोशल डिजिटल माध्यमांद्वारे हा कार्यक्रम पाठवून त्याद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे. 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर अध्ययन आराखडा हा सुट्टीतील अभ्यास आहे, यात दोन्ही सत्रातील पाठ्यक्रमाचा समावेश केला आहे. हा अभ्यास कौशल्यावर आधारित आहे. यातील कौशल्याचा एक घटक दररोज अभ्यासाला घेतला जाणार आहे. सर्व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातील असल्याने पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील.

पालकांनी दिक्षा (DIKSHA) अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे, पाठ्यपुस्तकातील क्युआर कोड स्कॅन करून घटकातील व्हिडीओ मुलांना दाखवावेत, भाषण, वाचन, लेखन व भाषा समृद्धी या घटकांवर हा अभ्यास आधारित आहे, हा प्रकल्प राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

असा राबविणार उपक्रम

  • वर्गशिक्षक, पालकांच्या मदतीने उपक्रम 
  • सोशल मिडीयाच्या माध्यमातून सनियंत्रण 
  • पुढील वर्षाच्या अभ्यासाचीही पुर्वतयारी 
  • वाचन, लेखन, भाषण यावर आधारित अभ्यासक्रम 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...