Students, farmers, satisfied with experiences of agricultural entrepreneurs
Students, farmers, satisfied with experiences of agricultural entrepreneurs

कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले विद्यार्थी, शेतकरी

बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या अडीअडचणींवर मात करत कसे उद्योजक झालो या कृषी उद्योजकांच्या प्रत्यक्ष अनुभव कथनाने येथे उपस्थित विद्यार्थी आणि शेतकरी भारावून गेले. निमित्त होते पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, सकाळ-ॲग्रोवन आणि महाधन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २६) आयोजित ‘कृषी उद्योजकता विकास' या विषयावरील एकदिवसीय ‘चला उद्योजक बनूया' या कार्यशाळेचे...

कार्यशाळेत कृषी उद्योजक श्‍यामसुंदर जायगुडे, कृष्णा फडतरे, संजय जगताप, सुभाष काकडे, प्रवीण चव्हाण यांनी अनुभव कथन केले. सकाळ ॲग्रोवनचे उपसंपादक सतीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमित झांबरे होते. या प्रसंगी डॉ. हरी हाके, डॉ. पी. टी. कोळेकर, डॉ. एस. टी. गोरे मान्यवर उपस्थित होते. 

श्री. जायगुडे म्हणाले, ‘‘रासायनिक अंशांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि आरोग्यदायी सेंद्रिय उत्पादनांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत आहे. सेंद्रिय शेतीसह विविध प्रक्रिया उत्पादनामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहे. ’’ 

श्री. फडतरे म्हणाले, की आम्ही शेतीला पूरक म्हणून भोरमध्ये कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला. पुणे, मुंबईसह शहरी पर्यटकांची शेतीकडे असणारी ओढ आणि वाढत्या शहरीकरणासोबत कृषी पर्यटनालाही चांगले दिवस येत आहेत. 

श्री. काकडे म्हणाले, की अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकडे ॲग्रो इक्विपमेंटस नावाचं फर्म उघडले. कडबा कुट्टी, मका भरडा यंत्र बाजारात आणले. पण ते फारसं चाललं नाही. पण जिद्द न सोडता ट्रॅक्‍टरचलित ट्रेलर व अवजारांवर लक्ष केंद्रित केले. उच्चशिक्षित असूनही नोकरी सोडून व्यवसायात उतरल्यामुळे लोक नावे ठेवत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्योजक बनलो. 

श्री. चव्हाण म्हणाले, की तोंडले बोंडले (ता. माळशिरस) येथे उभारण्यात आलेल्या युनिटेक इरिगेशन सिस्टिमद्वारे ठिबक संचाचे उत्पादन घेत आहे. इनलाईन ड्रीप मागणीनुसार बनवतो. बॅंकेकडून २३ लाखांचे कर्ज घेत सुरू केलेल्या या व्यवसायात प्रगती करत आहे. सूत्रसंचालन शाल्मली सस्ते व ऋतुजा काळे यांनी केले. आभार मोहसीन बोहरी यांनी मानले.

 ‘स्टार्टअप सुरू करण्याच्या संधी’

शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अनेक समस्यांवर कृषी तंत्रज्ञानाच्या साह्याने मार्ग काढणे शक्य आहे. भारतीय कृषी मंत्रालयाने ओळखलेल्या बारा कृषी विषयक आव्हानांवर नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. या संधीचा लाभ घेत उद्योगाच्या उभारणीसाठी तरुण शेतकरी, कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी, अभियंत्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com