राज्यस्तरीय पशू चिकित्सालयीन परिषदेत विद्यार्थ्यांचा गौरव

राज्यस्तरीय पशू चिकित्सालयीन परिषदेत विद्यार्थ्यांचा गौरव
राज्यस्तरीय पशू चिकित्सालयीन परिषदेत विद्यार्थ्यांचा गौरव

अकोला : येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय चिकित्सालयीन परिषदेत विविध गटात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना समारोपीय सत्रात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या स्थापनेच्या सुवर्ण वर्षानिमित्त पशू प्रजनन विभागातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या घटक महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी व शिक्षक परिषदते सहभागी झाले.  डॉ. हेमंत बिराडे, माफसूचे संशोधन संचालक डॉ. ए. पी. सोमकुवर, शिक्षण विस्तार परिषदेचे सदस्य डॉ. शरद भारसाकळे, डॉ. चैतन्य पावशे, संयोजक डॉ. श्‍याम देशमुख उपस्थित होते. 

या परिषदेत विविध सत्रात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात पशू प्रजनन विषयात प्रथम बक्षीस डॉ. अभिषेक भारद्वाज (नागपूर, पशुवैद्यक महाविद्यालय) यांनी, द्वितीय डॉ. मनिषा पित्रोडा (क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, शिरवळ), तर तृतीय डॉ. व्ही. एस.बेलुरे (उदगीर पशुवैद्यक महाविद्यालय) यांनी पटकाविले.

पशू शल्यक्रिया शास्त्र सत्रात डॉ. रीना नाथानी (नागपूर), डॉ. नेहा भावे (अकोला), डॉ. चैत्राली आव्हाड (परभणी) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले. पशुऔषधोपचार शास्त्र विषयात डॉ. गौरी थाडे (नागपूर), डॉ. गुरुनुर कौर, डॉ. हर्षदा गमे, तर पॅरा क्‍लिनिकलमध्ये डॉ. स्नेहा थोरात (नागपूर), डॉ. माधुरी कांबळे (अकोला), डॉ. अंजली पाटील (अकोला) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com