agriculture news in Marathi students produce vegetable from home Maharashtra | Agrowon

शालेय विद्यार्थ्यांनी घरीच पिकविला भाजीपाला 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

जवळपास तिनशेहून अधिक विद्यार्थी हा अगळावेगळा उपक्रमात सहभागी असून, त्यांना घराच्या बाल्कनीतील कुंड्यांमध्ये मिरची, वांगी, टोमॅटो या भाज्यांची लागवड केली आहे.

पुणे : झील शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल व सिल्वर क्रेस्ट स्कूलमधील विद्यार्थी घरच्या घरीच भाजीपाला पिकवत आहेत. जवळपास तिनशेहून अधिक विद्यार्थी हा अगळावेगळा उपक्रमात सहभागी असून, त्यांना घराच्या बाल्कनीतील कुंड्यांमध्ये मिरची, वांगी, टोमॅटो या भाज्यांची लागवड केली आहे. टाळेबंदीच्या काळात शहरातील विद्यार्थ्यांनी स्वत: पिकविलेली भाजी खाण्याची मजा चाखली आहे. 

ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल व सिल्वर क्रेस्ट स्कूलचे इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी बारामती येथे एक दिवसीय शेतीविषयक अभ्यासक्रम केला. सहावीच्या अभ्यासक्रमातील विज्ञान व पर्यावरणविषक गोष्टींचा समावेश करुन ‘गो गेट एक्स’ ने हा कोर्स तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील प्रात्यक्षिके अनुभवली व शेतात कामही केले. यातून त्यांना माती, पाणी, पाऊस, फळ भाज्यांचे प्रकार, हवामान इत्यादी प्रकार शिकायला व अनुभवायला मिळाले. 

या एक दिवसीय कोर्सनंतर विद्यार्थ्यांना काही फळ भाज्यांची रोपं व सोबत देण्यात आले होते. कोर्सचा भाग म्हणून दिलेल्या रोपांचे काळजी घेऊन घरातील बाल्कनीत कुंडीमध्ये ही रोपं वाढवायची होती. गेल्या महिनाभरातील टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यंनी त्या रोपांची वाढ तर केलीच आणि आता त्याला फळ भाज्या आल्या व त्याची भाजी बनवून जेवणात आस्वादही घेत आहेत. ‘भविष्यातील पिढीला शेतीचे महत्व पटले पाहिजे व शेतकऱ्यांचा आदर या पिढीने पुढे केला पाहिजे या हेतूने आम्ही हा एक दिवसीय कोर्स तयार केल्याचेच गो गेट एक्सचे संस्थापक स्वप्नील रांजणे यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...