Agriculture news in marathi, Students will be impressed with diverse ideas: Ashok Dhawan | Agrowon

वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी प्रगल्‍भ होतील :डॉ. अशोक ढवण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व सामाजिक पार्श्‍वभूमी वेगळी आहे. यामुळे महाविद्यालयीन जीवनात वैविध्यपूर्ण सांस्‍कृतिक, बौ‍द्धिक विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व प्रगल्‍भ होईल,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व सामाजिक पार्श्‍वभूमी वेगळी आहे. यामुळे महाविद्यालयीन जीवनात वैविध्यपूर्ण सांस्‍कृतिक, बौ‍द्धिक विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व प्रगल्‍भ होईल,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत २०१९-२० मध्‍ये भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ झाला. ११ राज्‍यातील १५० पेक्षा जास्‍त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या विविध महाविद्यालयांतील पदवी, पदव्‍युत्तर व आचार्य पदवी अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतला आहे. परभणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद सावते, लातूर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ. डी. एन. धुतराज, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, डॉ. हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉ. ढवण म्‍हणाले, ‘‘पालकांच्‍या आपल्‍या मुलांकडून अनेक अपेक्षा असतात. शिक्षणासाठी गाव सोडणे त्रासदायक असते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आई-वडिलांच्‍या संस्‍कारांची सातत्याने जाण ठेवावी. यापूर्वीही विद्यापीठातून विविध राज्‍यांतील अनेक विद्यार्थ्‍यांनी पदवी प्राप्‍त करून चांगले यश संपादन केले आहे. विद्यार्थ्‍यांना शिकवताना प्राध्‍यापकांनाही स्‍वत:च्‍या अध्‍यापनात सुधार करण्‍याची संधी आहे.’’

डॉ. रणजित चव्‍हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रल्‍हाद जायभाये यांनी आभार मानले. देशातील ११ राज्‍यांतील १७३ विद्यार्थ्‍यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्‍यमातून प्रवेश घेतला. यात राजस्‍थान, पश्चिम बंगाल, उत्‍तर प्रदेश, बिहार, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, ओडिशा, मध्‍य प्रदेश, मनिपूर आदी राज्‍यांतील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.

इतर बातम्या
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल...बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी...फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी...
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर...रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या...
वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे...अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य...
नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी...नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या...
नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३०...येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच...यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट...सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण...नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल...
भाजप सत्ता स्थापन करणार नाही :...मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण...
श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण...श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात...
`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...