विद्यार्थ्यांना मिळणार प्रगत शेतीचे धडे

पारंपरिक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातील ९५ टक्‍के विद्यार्थी शेतकऱ्यांची मुले आहेत. विद्यापीठांतर्गंत प्रवेशित विद्यार्थी संख्या तीन लाखांवर आहे. त्यांच्यापर्यंत ग्रामविकास व स्वयंरोजगारांच्या उद्देशाने शेती व शेतीपूरक माहिती पोचविण्याचा उद्देश या प्रशिक्षणाचा आहे. - डॉ. मुरलीधर चांदेकर कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
विद्यार्थ्यांना मिळणार प्रगत शेतीचे धडे
विद्यार्थ्यांना मिळणार प्रगत शेतीचे धडे

अमरावती : पारंपरिक विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती आणि पूरक व्यवसायाची माहिती व्हावी, या उद्देशाने त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून प्रगत शेतीचे धडे दिले जाणार आहेत.    

विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांत आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये सुमारे तीन लाखांवर विद्यार्थी प्रवेशित असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. पारंपरिक शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेल्यांपैकी ९५ टक्‍के विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्यापर्यंत प्रगत शेतीचे तंत्रज्ञान पोचलेच नाही. त्यांना ते ज्ञान मिळावे म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठ आणि माफसूचे सहकार्य त्यासाठी घेतले जाईल. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी नुकतीच माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची भेट घेतली. 

कृषी विद्यापीठ, माफसूची मदत

उन्नत शेती अभियानातून पारंपरिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रगतशेतीची शिकवण दिली जाईल. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com