agriculture news in marathi studious and experimental farmers doing Export quality grapes production | Agrowon

अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे निर्यातक्षम द्राक्षबाग व्यवस्थापन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

द्राक्षवाणांची निवड, हवामान केंद्राची मदत, मार्केटिंग आदी बाबतीतही या बागायतदारांनी कुशलता मिळवली आहे. त्यातील काही प्रातिनिधिक व ताजी उदाहरणे आपण अभ्यासूया.

महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत प्रयोगशील व अभ्यासू समजले जातात. दरवर्षी कोणते ना कोणते तंत्रज्ञान अभ्यासून आपल्या द्राक्षबागेत त्याचा वापर करून एकरी उत्पादकता व मालाची गुणवत्ता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र या बाबी साध्य करताना जमिनीची सुपीकता वाढवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. द्राक्षवाणांची निवड, हवामान केंद्राची मदत, मार्केटिंग आदी बाबतीतही या बागायतदारांनी कुशलता मिळवली आहे. त्यातील काही प्रातिनिधिक व ताजी उदाहरणे आपण अभ्यासूया.

हवामान केंद्रित शेतीपध्दतीचा वापर
नाशिक जिल्ह्यातील वडाळी नजीक (ता. निफाड) येथील रोशन झाल्टे हा युवा द्राक्ष बागायतदार हवामानकेंद्रित शेती व्यवस्थापन करतो आहे. त्यांनी आपल्या बागेत अत्याधुनिक ‘वेदर स्टेशन’ उभारले आहे. त्यात ११ सेन्सर्सचा वापर केला आहे. सध्या त्यांचे सुमारे १५ एकर द्राक्षक्षेत्र आहे. रोशन यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून ‘कृषी अभियांत्रिकी’ ची (बी.टेक) पदवी घेतली आहे. वडील अनिल, काका विश्वास व भाऊ राकेश यांची त्यांना शेतीत साथ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील द्राक्षसल्लागार रॉड्रीगो ओलीव्हा यांच्या मार्गदर्शनातून त्यांची द्राक्षशेती आकारास आली आहे. झाल्टे यांचे नियोजन अभ्यासण्याजोगे आहे. ते पुढीलप्रमाणे.

 • माती, पान, देठ परीक्षणाद्वारे खतांचे नियोजन
 • फवारणी, डिपींगसाठी अत्याधुनिक यांत्रिकीकरण
 • 'प्रिसिजन' तंत्राआधारे सिंचनप्रणाली
 • मजूर टंचाईवर मात
 • अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्राची बागेत उभारणी. त्याद्वारे उपलब्ध हवामान घटकांच्या तपशिलाच्या आधारे पीक व्यवस्थापन. या तंत्रज्ञानात ११ सेन्सर्सचा वापर. यामध्ये मुळांच्या कक्षेभोवती ओलावा, मातीचे व हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता, हवेचा दाब, वेग व दिशा, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाश तीव्रता आदी बाबी मोजता येतात.
 • ही सर्व माहिती ‘डेटा सर्व्हर'ला जाऊन दर पंधरा मिनिटांनी अपडेट होते. ती मोबाईलवरही पाहणे शक्य होते.
 • संभाव्य कीड- रोगांचा प्रादुर्भाव समजून त्यानुसार फवारणीचे नियोजन साध्य होते.
 • अभ्यास, कष्ट, शिकाऊवृत्ती व सुधारित तंत्र वापरण्याच्या वृत्तीतून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ घेणे शक्य झाले आहे.
 • एकरी उत्पादन १२ ते १५ टनांपर्यंत ते घेत आहेत.
 • यासह पाणी वापरात ३० टक्के तर खते व फवारण्यांच्या खर्चातही २० टक्के बचत केली आहे.
 • द्राक्षांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने जर्मनी, नेदरलँड येथे निर्यात होते. यंदा कोरोना लॉकडाऊन काळातही निर्यात यशस्वी केली आहे.

संपर्क- रोशन झाल्टे- ९४२२९३१३७८

पाणी तंत्रज्ञानातून दुष्काळी भागात निर्यातक्षम द्राक्षशेती

 • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका आहे. येथील पांढुर्ली येथील रवींद्र बोराडे यांनी पाणीसमस्येचे आव्हान पेलून सिंचनाचे तंत्रज्ञान अभ्यासले. त्यातून पाण्याचे काटेकोर नियोजन करीत निर्यातक्षम द्राक्षशेती यशस्वी केली आहे.
 • त्यांच्याकडे क्लोन २ सुमारे २० एकर, क्रिमसन १५ एकर तसेच थॉमसन ५, सोनाका ८ एकर, आरा असे विविध वाण आहेत.
 • प्रत्येकी ५० लाख लिटर क्षमता असलेल्या दोन जलसाठे आहेत. रवींद्र महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष आहेत. बंधू विलास यांची त्यांना साथ आहे. त्यांची नवी पिढीही आधुनिक द्राक्ष शेती करते.

सिंचन व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

 • ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाचा वापर. प्लॉटनिहाय नियोजन.
 • सुमारे ६० एकरांत ड्रीप ऑटोमेशन. प्रत्येकी ३० एकरांचे दोन भाग.
 • -चढउताराच्या जमिनीत योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास.
 • माती परीक्षणाद्वारे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता तपासली.
 • प्रत्येक फुटावर १. ६ लिटर प्रती तास डिस्चार्ज किंवा प्रति झाड प्रति तास २० लिटर पाणी नियोजन.
 • गटात सहभागी होऊन त्याद्वारे जागतिक स्तरावरील द्राक्षतज्ञ रॉड्रीगो ऑलिव्हा यांचे मार्गदर्शन. --
 • मातीचा प्रकार, भौतिक स्थिती, ओलावा, पाणीधारण शक्ती, मुळांचा विस्तार, झाडांची पाण्याची गरज, जमिनीतून होणारे बाष्पीभवन आदी बाबींचा अभ्यास.
 • त्यातून छाटणी ते फुलोरा, फळधारणा ते पाणी उतरण्याची अवस्था व पाणी उतरण्याची अवस्था ते काढणी अशा तीन टप्प्यांत पाण्याचे नियोजन व वितरण
 • मोहाडी येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कार्यान्वित प्रकल्पाद्वारे बागेत वेदर स्टेशन. ‘सॉईल मॉयश्‍चर सेन्सर’ बसविला आहे. त्याद्वारे पुढील सात दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेऊन सिंचन व्यवस्थापन.
 • या सर्व वापरातून पाण्याचा वापर कार्यक्षम. थंडीत मण्यांना तडे जाण्याची समस्या कमी झाली. मजूर खर्च व वेळेत बचत.
 • निर्यातक्षम द्राक्षांचे दरवर्षी एकरी १० टनांपर्यंत उत्पादन. पैकी सुमारे ८० टक्के माल निर्यातक्षम गुणवत्तेचा.

संपर्क - सुकृत बोराडे - ८३९००९३६४५

‘सबसरफेस' व सिंचनतंत्राचा काटेकोर वापर
होनसळ (जि. सोलापूर) येथील शिवाजी लक्ष्मण पवार यांनी आपल्या ५० एकर बागेत सबसरफेस ठिबक तंत्राचा (जमिनीखालील ठिबक) प्रयोग केला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत.
त्यांच्याकडे माणिक चमन, सुपर सोनाका, आरके ८, निवड पध्दतीचे एसएसएन व अनुष्का वाण, सोनाका असे विविध वाण आहेत. एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्रातून ते निर्यात साधतात.

पवार यांच्या शेती व्यवस्थापानाची वैशिष्ट्ये

 • जैविक मल्चिंगवर भर. गोड्या छाटणीनंतर बोदावर प्रत्येक दोन झाडांमध्ये ऊसपाचटाचे बंडल. त्यातून
 • पाण्याचे बाष्पीभवन थांबले. मातीचा मुलायमपणा वाढला. गांडुळांची संख्या वाढली.
 • सुमारे वीस देशी गायींचे संगोपन. शेण व गोमूत्र स्लरीचा ट्रॅक्टरचलित टँकरच्या साह्याने वापर.
 • होनसळ भागात पाण्याचा कोणता मोठा स्रोत नाही. पाऊसमान अत्यंत कमी असल्याने पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून चार एकरांत शेततळे उभारून सात कोटी लिटर क्षमतेपर्यंत पाण्याचा शाश्‍वत पाणीसाठा.
 • शेतात तीन खड्डे व बंधारा उभारून जलसंधारण. पाईपलाईनद्वारे हे पाणी शेततळ्यात घेतले. स्वखर्चाने खोली-रुंदीकरण.
 • सर्व ५० एकरांत सबसरफेस ठिबकचा वापर. बोदावर इनलाईन ठिबक. मात्र दोन झाडांच्या ओळीत मधल्या भागात सुमारे नऊ इंच सबसरफेस लाईन. प्रति ड्रिपर प्रति तास सव्वाअकराशे मिली पाणी.
 • झाडाच्या मुळ्या बुडाच्या परिघात किमान ४ ते ५ फुटापर्यंत पसरलेल्या असल्याने ‘सबसरफेस' द्वारे जमिनीतून दोन्ही बाजूच्या झाडांच्या मुळांना पाणी उपलब्ध होते. पाण्यातील ऑक्सिजन मिळतो. झाड सशक्त होते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते.
 • बागेच्या चारही बाजूंनी एन्डकॅपला दोन इंच स्वतंत्र पाईपलाईन्स. त्याद्वारे ड्रेनेज लाईन. त्यामुळे कमी वेळेत नळ्या स्वच्छ होतात.

‘सबसरफेस' व एकूण तंत्रज्ञानाचे फायदे

 • नेहमीच्या ठिबकद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिदिन दहा हजार लिटर पाण्याचा वापर सबसरफेसद्वारे तीन हजार लिटर पर्यंत घटले.
 • त्याद्वारे पाणी, वेळ व विजेची ६० ते ७० टक्के बचत.
 • उत्पादनात एकरी दोन ते अडीच टन वाढ.
 • द्राक्षाचा रंग, आकार व रंग यातही फरक
 • निर्यातक्षम द्राक्षांचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन. चीन, श्रीलंकेत निर्यात.

संपर्क- शिवाजी पवार- ९४२२६४९३०७, ८७८८६४९३७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...
‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...
अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...
कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...
यांत्रिकीकरणातून होताहेत आदिवासी आर्थिक...पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यांतील...
पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलतापारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला)...
शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली...पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील...
शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशीलजळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले...
महिला बचत गटांची दुग्धव्यवसायात भरारीखडकूत गावातील बचतगटांना महिला आर्थिक ...
शेतीला मिळाली शेळीपालनाची साथशिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथील पंकज...