मेळघाटातील युवकांकडून शेतीपद्धतीचा अभ्यास

औरंगाबाद : मेळघाटातील चिखलदरा तालुक्या अंतर्गतच्या चिलाटी, हातरु, सीमोरी व भांडूम येथील युवकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगाव, माळीवाडगाव व देवगाव येथे पाच दिवसांत व्यावसायिक शेळीपालन, मुरघास निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, चारा व्यवस्थापन, रेशीम उद्योग, भाजीपाला व फळपिकांचा अभ्यास केला.
Study of farming methods by the youth of Melghat

पुणे येथील मैत्री संस्थेतर्फे मेळघाटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व पूरक उद्योगाची ज्ञान आत्मसात व्हावे म्हणून या अभ्यास प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. चिलाटी, हातरु, सीमोरी, भांडुम या चिखलदरा तालुक्यातील दिलीप भुसुम, विलास तीवलकर, मांगीलाल मावस्कर, अशोक भूसुम, अनिल बेठेकर महेंद्रसिंग बेठेकर हे युवा शेतकरी सहभागी झाले. 

व्यवसायिक शेळीपालन, पाणी व्यवस्थापन, मुरघास निर्मिती, चारा व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती, शेतीचं अद्यावत तंत्र, रेशीम उद्योगाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा अभ्यास दौरा खूप महत्त्वाचा ठरला आहे. - अनिल बेठेकर, शेतकरी, भांडूम, जि. अमरावती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com