agriculture news in Marathi study of FRP started Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘एफआरपी’चा अभ्यास सुरू 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या ‘एफआरपी’च्या सध्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुरू झाला आहे. अंतिम अहवाल ऑगस्टअखेर शासनाला सादर केला जाईल.

पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या ‘एफआरपी’च्या सध्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुरू झाला आहे. अंतिम अहवाल ऑगस्टअखेर शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एफआरपीची सध्याची कार्यपद्धत नेमकी काय आहे, त्यातील उणिवा आणि सुधारणा सुचविण्यासाठी राज्य शासनाने अभ्यास गट तयार केला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गटाने एफआरपी कार्यपद्धतीची माहिती गोळा करण्यास सुरुवातदेखील केली आहे. गटाच्या अजून २-३ बैठका होतील. सदस्यांची एकत्रित मते जाणून ऑगस्टअखेर ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे. 

एफआरपीच्या अभ्यासात साखर संघ, विस्मा, व्हीएसआय, साखर आयुक्तालय तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एफआरपी काढताना इथेनॉलशी असलेला संबंध या गटाकडून तपासला जात आहे. एफआरपी काढताना मागील हंगामाचा उतारा विचारात घेतला जातो. मात्र कारखाना काही हंगाम बंद असल्यास नेमका कोणता उतारा गृहीत धरायचा हा मुद्दा तपासला जात आहे. 

ऊसतोडणी व वाहतूक खर्च विचारात घेऊन उतारा निश्‍चित करता येईल काय किंवा ते शक्य नसल्यास आणखी कोणता पर्याय असू शकतो. केंद्राने जाहीर केलेल्या एफआरपीमधून तोडणी व वाहतूक खर्च कशा पद्धतीने वजा करायचा याचे धोरण ठरविण्याचा प्रयत्न अभ्यास गटाकडून केला जाणार आहे. 

सर्वच मुद्द्यांचा अभ्यास 
शेतकऱ्यांना एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) देताना ऊस नियंत्रण आदेश १९६६ तसेच महाराष्ट्र ऊसदराचे विनियमन कायदा २०१३ मधील तरतुदींचा विचार केला जातो. याशिवाय विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांचा देखील अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यास गटाकडून केंद्रीय कायदा, राज्याचा कायदा, न्यायालयाची भूमिका आणि सध्याची स्थिती अशा चारही मुद्द्यांचा अभ्यास केला जात आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...