पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ राव यांनी स्वीकारली

पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड स्थितीशी निकराने सामना करण्याचा निर्धार त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना व्यक्त केला.
Saurabh Rao
Saurabh Rao

पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड स्थितीशी निकराने सामना करण्याचा निर्धार त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना व्यक्त केला.  आधीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर निवृत्त झाल्यामुळे या बहुचर्चित पदावर शासनाने राव यांना संधी दिली. आयएएसच्या २००३ मधील महाराष्ट्र तुकडीतील राव हे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी प्राचीन भारत विषयात पदवी तर राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुण्यात आधी त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. वर्धा, भंडारा, नागपूर जिल्ह्यात त्यांनी विविध पदांवर कामे केली आहेत.  २०१२ मध्ये राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून विशेष पुरस्कार दिला. त्यानंतर उत्तम कामकाजाबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने २०१५ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते.  महसूल आयुक्तालय कर्मचाऱ्यांनी राव व म्हैसेकर यांचा सत्कार केला. ‘‘चांगल्या प्रशासकीय कार्यप्रणालीमुळे राज्याचे नाव देशभरात चर्चेत असते. डॉ. म्हैसेकर यांच्या चांगल्या कार्यपद्धतीचा, बारकाईने अभ्यास करण्याच्या गुणांचा फायदा आम्हाला होणार आहे. कोविड परिस्थितीवर मात करण्यास त्यांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे,’’ असे श्री. राव म्हणाले.  डॉ. म्हैसेकर म्हणाले की, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य पार पाडावे. परिस्थितीची देखील जाणीव ठेवावी. तसेच, समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत कामे केल्यास आनंद मिळतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com