agriculture news in Marathi Suarabh Rao on divisional commissioner Maharashtra | Agrowon

पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ राव यांनी स्वीकारली

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड स्थितीशी निकराने सामना करण्याचा निर्धार त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना व्यक्त केला.

पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड स्थितीशी निकराने सामना करण्याचा निर्धार त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताना व्यक्त केला. 

आधीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर निवृत्त झाल्यामुळे या बहुचर्चित पदावर शासनाने राव यांना संधी दिली. आयएएसच्या २००३ मधील महाराष्ट्र तुकडीतील राव हे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी प्राचीन भारत विषयात पदवी तर राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुण्यात आधी त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. वर्धा, भंडारा, नागपूर जिल्ह्यात त्यांनी विविध पदांवर कामे केली आहेत. 

२०१२ मध्ये राज्य शासनाने त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून विशेष पुरस्कार दिला. त्यानंतर उत्तम कामकाजाबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने २०१५ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले होते. 

महसूल आयुक्तालय कर्मचाऱ्यांनी राव व म्हैसेकर यांचा सत्कार केला. ‘‘चांगल्या प्रशासकीय कार्यप्रणालीमुळे राज्याचे नाव देशभरात चर्चेत असते. डॉ. म्हैसेकर यांच्या चांगल्या कार्यपद्धतीचा, बारकाईने अभ्यास करण्याच्या गुणांचा फायदा आम्हाला होणार आहे. कोविड परिस्थितीवर मात करण्यास त्यांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे,’’ असे श्री. राव म्हणाले. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले की, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य पार पाडावे. परिस्थितीची देखील जाणीव ठेवावी. तसेच, समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत कामे केल्यास आनंद मिळतो.


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...