उद्योगमंत्री देसाईंच्या स्वागताला काँग्रेसच्या नेत्यांचीच गर्दी

उद्योगमंत्री देसाईंच्या स्वागताला काँग्रेसच्या नेत्यांचीच गर्दी
उद्योगमंत्री देसाईंच्या स्वागताला काँग्रेसच्या नेत्यांचीच गर्दी

अकोला : केंद्र व राज्यात सत्तेत सोबत राहूनही मित्र पक्ष भाजपला अडचणीत आणण्याची संधी न सोडणारे शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अकोला दौऱ्यात भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी चार हात लांबच राहिले. मात्र या संधीचा फायदा विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आणि सुभाष देसाई यांच्या स्वागतासाठी गर्दी केली.  केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेतील तणावाचे वातावरण दिवसेंदिवस तापतच आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असल्याने, भाजप-सेनेत कलगीतुरा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही भाजप-सेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी एकमेकांविरुद्ध आंदोलन पुकारत परस्परांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.  अकोल्यातील आरडीजी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी गुरुवारी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी सेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी भाजपचे आमदार, पदाधिकाऱ्यांनी जाणे टाळले. मात्र काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अजहर हुसेन, महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, रमाकांत खेतान, डॉ. अभय पाटील, यांच्यासह सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, गोपाल दातकर, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, विठ्ठल सरप, नगरसेवक शशी चोपडे, मंगेश काळे, संतोष अनासाने आदींनी स्वागत केले.  राज्यातील सत्तेत सोबत राहूनही भाजपला अडचणीत आणण्याची संधी न सोडणाऱ्या शिवसेनेकडून भाजपवर सतत टीका सुरू असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दोन्ही पक्षांतील तणावावर भाष्य करण्याचे टाळत मध्यावधी निवडणुकीबाबत काही सांगू शकत नसल्याची सावध प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची कामगिरी दमदार राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com