मी कधी म्हणालोय माढ्यातून लढणारः देशमुख

मी कधी म्हणालोय माढ्यातून लढणारः देशमुख
मी कधी म्हणालोय माढ्यातून लढणारः देशमुख

सोलापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता माढा मतदारसंघासाठी चर्चेत असलेले संभाव्य उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आता "मी कधी म्हणालो माढ्यात उभे राहणार?'', असे सांगून गुगली टाकली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांतील संभ्रम आणखीनच वाढला आहे.  माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण कल आणि कौटुंबिक चर्चेनंतर पवार यांनी माढ्यातील उमेदवारी रद्द केली. त्यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेली सोशल मीडियाच्या माध्यमातील चर्चा बंद झाली. पण त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे देशमुख यांचे नाव पूर्वीपासूनच चर्चेत आहे. त्यानुसार त्यांनी माढा मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून प्रचार दौरेही सुरू केले. पण पवार यांनी माघार घेताच देशमुख यांनीही मोडनिंब येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत "मी कधी म्हणालोय माढ्यातून उभारणार,'' असा प्रतिसवाल कार्यकर्त्यांना करून गुगली टाकली. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे मंत्री देशमुख या भागातील गावभेट दौऱ्यावर फिरत आहेत. दुसरीकडे या वक्तव्याने संभ्रमात आणखीन भर पडली आहे. पवार यांच्या माघारीनंतर आता विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह यांची नावे चर्चेत आहेत. पण ऐनवेळी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यास रणजितसिंह हे बंड करून भाजपच्या गोटात जाऊ शकतात. त्यामुळेही मंत्री देशमुख चाचपणी करत असल्याचे बोलले जाते.  सोलापुरात शिंदे यांची वाट कठीण सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे नाव मागे पडले आहे. सध्या शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून खासदार अमर साबळे किंवा जगदगुरू डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. पण वंचित बहुजन आघाडीकडून ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता आहे. लिंगायत बहुल भागामुळे शिवाचार्य यांना मिळणाऱ्या, तर आंबेडकर यांना दलितांच्या मिळणाऱ्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांची विजयाची वाट कठीण मानली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com