सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन माहिती दाखल करा

सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Submit information online for crop insurance compensation in Solapur district
Submit information online for crop insurance compensation in Solapur district

सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी ही माहिती ऑनलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) मोबाईल अॅपद्वारे आणि customer.service@bhartiaxa.com या ईमेलवर किंवा तालुका कृषी कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले. 

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. या अॅपद्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विमा प्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल शासनाला सादर करतील.  ज्यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती दाखल करण्याचे आवाहन माने यांनी केले. 

विमा प्रतिनिधींची नावे, संपर्क क्रमांक 

अक्कलकोट (दशरथ यळसंगे-८७८८२६८७९८), दक्षिण सोलापूर (अजित सावंतराव-९१७५०२००९१, उत्तर सोलापूर (नागेश भरडे-८७८८७९८७६६), मोहोळ (संदीप कीपनर-९५११९३५९९९), पंढरपूर (विष्णू गायकवाड-९१४६८६८१२७), मंगळवेढा (बसवराज सुतार-८६०५५४१७७), सांगोला (चेतन खटकाळे-९६६५६९८५६६), माळशिरस (उमेश पळसे-७०८३६९७१७२), बार्शी (किशोर वळसे-९९६०९९७८९९), माढा (आकाश नवसारे-९६६५२८३८१४) आणि करमाळा (अक्षयकुमार रेगुडे-८४५९६०१८८१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com