टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव सादर करा ः आमदार भुयार

अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण आणि पंचनामे करावे. त्याआधारे मदतीचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठविण्यात यावा, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.
Submit a proposal for help in locust infested areas: MLA Bhuyar
Submit a proposal for help in locust infested areas: MLA Bhuyar

अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण आणि पंचनामे करावे. त्याआधारे मदतीचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठविण्यात यावा, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले.

आमदार भुयार यांच्या मतानुसार, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत शेती कामे करणे आधीच जिकरीची झाली आहेत. कापूस व इतर शेतमालाची खरेदी देखील रखडत असल्याने शेतकऱ्यांकडे तोंडावर असलेल्या खरिपासाठी पैसा नाही. त्यातच वातावरणातील बदलामुळे टोळधाडीने संत्र्याचे आगार असलेल्या मोर्शी, वरुड तालुक्‍यात शिरकाव केला. टोळ किडीने संत्र्याची नवती फस्त केली. त्यासोबतच भाजीपाला उत्पादकांचेही नुकसान झाले. आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत यामुळे वाढ झाली. प्रशासनाने या संदर्भाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला, ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कृषी विभागाची यंत्रणा यामध्ये सहभागी होती. किडीवर नियंत्रण मिळविण्यात बऱ्याच अंशी यश आले. परंतु शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची देखील दखल घेणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रशासनाने नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण व पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठवावा, असे निर्देश आमदार भुयार यांनी दिले.

या गावात शिरकाव दापोरी, डोंगरयावली, मायवाडी, घोडदेव, हिवरखेड, उमरखेड येथून वरुड तालुक्‍यतील बारगाव, नागडझिरी, पळसोना, बेनोडा, जरुड, बहादा, इसंब्री, गव्हानकुंड, टेंभुरखेडा, शेंदूरजनाघाट, मालखेड, खेडी, पुसला या गावातून ही टोळधाड मोळविहीर पर्यंत पोचली.

टोळधाडीच्या हल्ल्यात संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला उत्पादकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेत आपदग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची गरज आहे. - देवेंद्र भुयार, आमदार मोर्शी विधानसभा, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com