हळद पीकविमा योजनेत समावेशासाठी प्रस्ताव सादर करा

हळद पीकविमा योजनेत समावेशासाठी प्रस्ताव सादर करा
हळद पीकविमा योजनेत समावेशासाठी प्रस्ताव सादर करा

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळद या पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी, बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (ता. २७) आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये श्री. कांबळे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कृषी सभापती प्रल्हाद राखुंडे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, विभागीय वनअधिकारी केशव वाबळे, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

श्री. कांबळे पुढे म्हणाले, की ‘‘गतवर्षीच्या खते, बियाणांच्या मागणी, पुरवठ्याचा विचार करून त्यापेक्षा जास्त संभाव्य मागणी वाढवावी. महाबीजने योग्य प्रमाणात बियाणे योग्य दराने उपलब्ध राहील याबाबत दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांची राष्ट्रीयीकृत बँकेकडे असलेली कृषी कर्जप्रकरणे जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन संबंधित सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना खरीप खते, बियाणे खरेदीकरिता पैशाची गरज असल्यामुळे सर्व कृषी कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढावित.’’

या वेळी श्री. कांबळे यांनी महावितरण विभाग, महाबीज विभाग, वन विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग याप्रमुख विभागांसह सर्व विभागांनाही सूचना दिल्या. प्रारंभी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘शेतकरी बंधू भगिनींना जाहीर आवाहन आणि इशारा’ आणि ‘बी. बी. एफ. तंत्रज्ञान’ या दोन माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. श्री. लोखंडे यांनी जिल्ह्यातील खते, बियाणे, कीटकनाशके बाबतीत उपलब्धता ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत जनजागृतीची कामे इत्यादीबाबत सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com