लखीमपूर खेरीप्रकरणी अहवाल सादर करा

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमधील शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडल्याच्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या अखत्यारित गुरुवारी घेतली.
Submit a report on Lakhimpur Kheri case
Submit a report on Lakhimpur Kheri case

नवी दिल्ली ः उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमधील शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडल्याच्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या अखत्यारित गुरुवारी घेतली. लखीमपूरमधील खेरी येथे ३ ऑक्टोबरला चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे. यासंदर्भात पोलिसांच्या ‘एफआयआर’मध्ये नोंदविलेल्या आरोपींची नावे व त्यांना अटक झाली की नाही, याचा स्थितिजन्य अहवाल शुक्रवारपर्यंत (ता.८) सादर करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारला न्यायालयाने दिला आहे. 

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठात झाली. भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने केलेल्या या कृत्यावर देशभरात तीव्र संताप व्यक्त करीत होत आहे. यातील आरोपींना राज्यातील भाजप सरकारचे अभय असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असून या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरन्यायाधीश रमणा यांनी याची आज स्वतःहून दखल घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) आणि न्यायालयीन चौकशी आयोग नेमला असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. त्यावर या दोन्ही यंत्रणांच्या तपासाची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. 

‘‘या घटनेत आठ व्यक्ती, त्यातील काही शेतकरी, एक पत्रकार आणि अन्य एक जण मारला गेला आहे हे तुम्ही स्वतः सांगितले आहे, कागदपत्रांमध्येही हा उल्लेख आहे आणि आम्हाला मिळालेल्या याचिकादाराच्या पत्रातही नमूद केले आहे. अशा भिन्न व्यक्तींचा खून करणाऱ्या या सर्व दुर्दैवी घटना आहेत,’’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले. तुम्ही ज्यांच्या विरोधात ‘एफआयआर’ नोंदविली आहे, ते आरोपी कोण आहेत आणि त्यांना अटक झाली की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ही सर्व माहिती तुमच्या स्थितिजन्‍य अहवालातून द्या, असे निर्देश देत शुक्रवारी (ता.८) सुनावणी घेण्याचे न्यायालयाने जाहीर केले. 

घटनेबाबत गंभीर नसल्याच्या तक्रारी  या घटनेकडे तुम्ही गंभीरपणे पाहत नसल्याची व ‘एफआयआर’ नीट दाखल न केल्याची तक्रारी असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या वकील गरीमा प्रसाद यांनी हा प्रसंग दुर्दैवी असल्याचे सांगत याच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटी’ आणि न्यायालयीन चौकशी आयोग नेमला आहे. उद्यापर्यंत आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती देऊ, असे वकिलांनी सांगितल्यावर ‘तुम्ही उद्या स्थितिजन्य अहवाल द्या. तसेच उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकांची स्थिती काय आहे, हेही स्पष्ट करावे, असे सरन्यायाधीश रमणा यांनी सुनावले. या घटनेत कोणाकोणाचा मृत्यू झाला आहे, हे सांगण्याचा आदेश न्या. सूर्यकांत यांनी दिला. मृत लवप्रीत यांची आई आजारी आहे, अशी माहिती एका वकिलाने आम्हाला दिली आहे. त्‍यांच्यावर उपचार करण्याचा आदेश सरन्यायाधीशांनी दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com