पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री

पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री

सोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव तत्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करा, अशा सूचना सोमवारी (ता. २१) पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील टंचाईबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.

 देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील दुष्काळी भागातील योजनांची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी. त्यानुसार पाणीपुरवठा योजना दुरुस्ती प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जावेत. ते प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवले जातील. या प्रस्तावांना मान्यता घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत ठेवावे. या पथकाने जिल्ह्यातील विविध योजनांच्या दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. सहकारी साखर कारखाना आणि औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी ३७.९ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेने नियमित योजनेत योजना दुरुस्ती करायला हव्या होत्या, पण त्या शक्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता टंचाईबाबतच्या कामातून त्या दुरुस्त करून घेऊया. त्यासाठी त्याचे प्रस्ताव पाठवा.’’

अर्थ आणि बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, सदस्य उमेश पाटील, मदन दराडे, आनंद तानवडे, त्रिभुवन धाईंजे, किरण मोरे, अण्णाराव बाराचारे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com