कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा उत्पादक संघाची फलोत्पादन मंत्र्यांकडे मागणी 

आंब्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे.
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या :  आंबा उत्पादक संघाची फलोत्पादन मंत्र्यांकडे मागणी Subsidize pesticide spraying:  Mango growers' union demands horticulture minister
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा उत्पादक संघाची फलोत्पादन मंत्र्यांकडे मागणी Subsidize pesticide spraying: Mango growers' union demands horticulture minister

मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर आंब्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शिवाय यंदा आंबा उत्पादनही घटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे. 

या बाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी म्हटले आहे, ‘‘ फेब्रुवारी महिन्यात हवामान बदलाचा मोठा फटका कोकण किनारपट्टीवर बसला आहे. अवकाळी पाऊस आणि विपरीत हवामानाचा परिणाम म्हणून आंबे खराब झाले आहेत. बागा काळ्या पडल्या आहेत. रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्चही वाढला आहे.

मागील चार वर्षे सातत्याने वेळ पाऊस अतिवृष्टी, अभ्राच्छादित वातावरणामुळे भुरी, थ्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव आंब्याच्या झाडावर वाढला आहे. परिणामी हापूसचे उत्पादन घटत आहे, यावर मात करून शेतकरी लवकरात लवकर आंबा तयार व्हावा यासाठी कष्ट घेत आहेत. मात्र, यंदा सतत हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादन ३० ते ३२ टक्क्यांवर निघणार आहे.

एप्रिलमध्ये हंगाम सुरू होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांना कीटकनाशक फवारणीसाठी अनुदान द्यावे.’’  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. भुमरे यांनी फलोत्पादन विभागाचे एकनाथ डवले यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली आहे, अशी माहितीही मोकल यांनी दिली आहे.

या पूर्वी अवेळी पाऊस झाल्यास आंबा फळ पिकाला नुकसान भरपाई मिळत असे. मात्र आता नुकसान भरपाईचे निकष बदलले आहेत. २५ मिलिमीटर पाऊस झाला तरच भरपाई मिळणार आहे. परिणामी १८, १९ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळीची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी आहे, या गोष्टीकडेही मोकल यांनी लक्ष वेधले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com