agriculture news in marathi, Subsidized soyabean seeds continue to work | Agrowon

नाशिक येथे अनुदानित सोयाबीन बियाणेवाटपाचे कामकाज सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जुलै 2019

नाशिक : चालू खरीप हंगामात ग्रामीण बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून या बियाण्यांचे लाभार्थींना वाटप होणार आहे. त्यासाठी ‘महाबीज’ने वितरकांना वाटपासाठी बियाणे दिले आहे, तर लाभार्थी निवड करून परमिट देण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

नाशिक : चालू खरीप हंगामात ग्रामीण बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून या बियाण्यांचे लाभार्थींना वाटप होणार आहे. त्यासाठी ‘महाबीज’ने वितरकांना वाटपासाठी बियाणे दिले आहे, तर लाभार्थी निवड करून परमिट देण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

‘महाबीज’ने अनुदानित बियाणे जिल्ह्यातील महाबीज बियाणे वितरकांकडे ठेवले आहे, मात्र काही ठिकाणी परमिटची मागणी करत असताना त्यांना ते मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कृषी विभागाने सोयाबीन बियाणे वाटपात अनुसूचित जाती ३९ % अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ११ टक्के तर सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के लाभार्थी निवड करून बियाणे वाटप करण्याबाबत परमिट वाटपाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम होत असताना निश्चित केलेल्या टक्केवारीवरून तसेच मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना परमिट मिळत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

२०१९-२० या वर्षात राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य वाटप उपअभियानांतर्गत खरीप हंगाम ग्रामीण बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाचे प्रमाणित दर्जाचे बियाणे अनुदानित तत्त्वावर वाटप करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यानुसार निवडलेल्या सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या तालुक्यात बियाणे वाटपाचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार तालुका पातळीवर परमिट देण्यात येत आहेत.

ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत खरीप २०१९ या हंगामासाठी अनुदानावर सोयाबीन जे एस. ३३५ चे वाटप महाबीज विक्रेत्यामार्फत सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला १ एकरप्रमाणे ३० किलो बियाणे बॅग देण्यात येणार आहे.  तिची मूळ किंमत १६८० रुपये असून, त्यावर ३०० रुपये अनुदान देण्यात आले आहे. ती १३८० रुपयांना विक्री होणार आहे.

तालुका बियाणे (क्विंटल)
नाशिक २००
निफाड ३००
सिन्नर २००
चांदवड २००
येवला २००
दिंडोरी २००
कळवण २००

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...