नांदेडमधील शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान

नांदेडमधील शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान
नांदेडमधील शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान

नांदेड : जिल्हा परिषदेतर्फे उपकर योजनेअंतर्गत २०१९-२० वर्षासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डी.बी.टी. आणि कॅशलेस पद्धतीचा अवलंब करून कृषी अवजारे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी केले. 

कृषी साहित्यामध्ये  बॅटरी कम हॅंड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, ३ एचपी, ५ एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) व नवीन तंत्रज्ञान आधारित मशिनरी प्रक्रिया यंत्रे इत्यादी कृषी साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर अनिव औजारे, कृषी साहित्य मिळण्यासाठी आवश्यकत्या सर्व कागदपत्रासह प्रस्ताव पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांतर्फे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय लक्ष्मण रेड्डी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी केले.

यासाठी मिळेल अनुदान...

बॅटरी कम हॅंड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार २ हजार आहे. एकूण लाभ द्यावयाची लाभार्थी संख्या २५०, ताडपत्री देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रतिऔजार २ हजार आहे. त्यासाठी लाभार्थी संख्या १ हजार, ३ एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रतिऔजार १० हजार, तर ५ एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रतिऔजार १५ हजार आहे. लाभार्थी संख्या १३३ आहे.

पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रतिऔजार १५ हजार, तर लाभार्थी  संख्या १३३ , नवीन तंत्रज्ञान आधारित मशिनरी प्रक्रिया यंत्रे देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रतिऔजार २० हजार आहे. लाभार्थी संख्या ५० आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नादरे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com