कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानवाटपाला वेग

कृषी यांत्रिकीकरणासाठी राज्यातील शेतकऱ्यांना २५० कोटी रुपये अनुदान मिळण्यासाठी आयुक्तालयाने वर्षभर पाठपुरावा केला. मागासवर्गीय गटात कमी अर्ज आल्यामुळे २०-३० कोटींचा शिल्लक निधी वगळता किमान सव्वादोनशे कोटी रुपये वाटले जाणार आहेत. सध्या राज्यभर अनुदानवाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. - विजयकुमार इंगळे, संचालक (गुण नियंत्रण विभाग), कृषी आयुक्तालय
कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानवाटपाला वेग
कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानवाटपाला वेग

पुणे: कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांमधून पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदार शेतकऱ्यांना अवजार अनुदानवाटपाची कामे वेगाने सुरू आहेत. मार्चअखेर किमान सव्वा दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. अवजार खरेदीसाठी विविध योजनांतून अनुदान देण्याचे गेल्या वर्षात जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यभर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तीन लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले असले तरी, अनुदान प्रत्यक्षात त्या प्रमाणात उपलब्ध झालेले नाही. “अर्थात, शेतकरी अर्ज करीत असले तरी प्रत्यक्ष अवजार खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २५ टक्क्यांच्या आसपास असते,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.  दोन लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी केलेले अर्ज बघता छाननीनंतर पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या आतच आहे. “अंदाजे ७० हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्याचे गृहीत धरले तरी, यातून पुन्हा प्रत्यक्ष खरेदी करून बिले सादर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजून कमी असते. त्यामुळे यंदा किमान ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा अंदाज आहे,” असे आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.  केंद्र शासनाने आधी ५० कोटीदेखील अनुदान देण्यास नकार दिला होता. मात्र, आयुक्तालयाने पाठपुरावा केल्यामुळे १५० कोटी रुपये देण्याचे केंद्राने कबुल केले. त्यातील १४५ कोटी रुपये राज्याकडेदेखील वर्ग झाले आहेत. त्यामुळे राज्याने यंदा आपल्या हिश्शातील ९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत.   मागासवर्गीय गटातील लाभार्थी मिळेना राज्य शासनाने अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना अवजार खरेदीसाठी १० कोटी रुपये व अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना १० कोटी अनुदान देणे अपेक्षित होते. राज्याने दोन्ही गटांत २० कोटी रुपये वाटल्यानंतर केंद्राकडून ३० कोटी रुपये मिळणार होते. मात्र, अपेक्षित लाभार्थी न मिळाल्याने मागासवर्गातील लाभार्थ्यांच्या वाट्याचे किमान ५० कोटी रुपये यंदा वाटले जाणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com