agriculture news in marathi, For the subsidy of Bond ali, the 'Swabhimani' stop at tahsil | Agrowon

बोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा तहसीलमध्ये ठिय्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळीचे प्रलंबित असलेले ८२ गावांसाठीचे १ कोटी ६ हजार रुपयांचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.१३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळीचे प्रलंबित असलेले ८२ गावांसाठीचे १ कोटी ६ हजार रुपयांचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.१३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. तहसीलदारांनी चार दिवसांत हे अनुदान देण्याचे अाश्वासन दिल्यानंतर अांदोलन मागे घेण्यात अाले. 
चिखली तालुक्यात सुद्धा बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून फेकली होती.

दरम्यान, शासनाने बोंड अळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चिखली तालुक्यातील २५ गावांतील अनुदानास पात्र शेतकऱ्यांना ६६ लाख रुपयांचे अनुदान आले होते. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र उर्वरीत अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ते मिळावे म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलक आक्रमक झाल्याने प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. मात्र, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संघटनेचे नितीन राजपूत, मयूरबोर्डे, उपजिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, राम अंभोरे, सुधाकर तायडे, संतोष शेळके, शे. मुक्त्यार, भागवत म्हस्के, प्रवीण झगरे, डॉ. जंजाळ, शोभा सुरडकर, बेबी हिवाळे, प्रशांत जयवार, मदन काळे, बाळू ठेंग यांच्यासह शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याशी अनुदानाबाबत चर्चा केली. गायकवाड यांनी चार दिवसांत अनुदान वाटप करण्याचे आश्वासन दिले.

 
 

इतर बातम्या
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...