agriculture news in Marathi subsidy of medicinal crop is pending Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा रखडविण्यात आले आहे. यापूर्वी केंद्राने पाठविलेला २६५ लाखांचा निधी हरविल्याचे प्रकरण गाजले होते.

पुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा रखडविण्यात आले आहे. यापूर्वी केंद्राने पाठविलेला २६५ लाखांचा निधी हरविल्याचे प्रकरण गाजले होते. 

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजनेतून शेतकऱ्यांना ६० प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी अनुदान मिळू शकते. ३० ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन मंडळाकडे देण्यात आली आहे. मात्र, ही योजना गावपातळीवर पोहोचलेली नाही. विदर्भात अमरावती, अकोला, बुलडाणा भागात ४०० ते ५०० हेक्टरवर वनौषधीची शेती बहरते आहे. अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याने कृषी विभागाकडे खेटे न मारता परस्पर वनौषधीचे उत्पादन घेतात.  

अनुदान वाटपातील मोठा गोंधळ २०१७-१८ मध्ये उघड झाला होता. २६५ लाख रुपये अनुदान असतानाही शेतकऱ्यांना न वाटता दाबून ठेवले होते. हा निधी सापडत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेली होती. निगरगट्ट अधिकाऱ्यांनी या तक्रारीनंतर देखील तब्बल तीन वर्षांनी अनुदान वाटले.  

नागार्जुन औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक कंपनीच्या म्हणण्यानुसार, योजनेचा गोंधळ २०१८-१९ मध्ये देखील सुरूच ठेवला गेला. शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवून घेण्यात आली. मात्र, अनुदान दिलेले नाही. आता शेतकऱ्यांना पुन्हा २०१९-२० ची कागदपत्रे आणण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

फलोत्पादन मंडळात यापूर्वी महावीर जंगटे, त्यानंतर डॉ. मेघना केळकर यांनी योजनेचा चांगला प्रचारप्रसार केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत टोलवाटोलवीची भूमिका शेतकरी अनुभवत आहेत. ‘हॉर्टनेट’ संकेतस्थळावर  ‘अनुदान मापदंडानुसार मिळते’ अशी मोघम माहिती देण्यात आली आहे. 

‘नागार्जुन’चे अध्यक्ष कमलकांत लाडोळे म्हणाले की, ‘‘अधिकाऱ्यांच्या खोडसाळपणामुळे वनौषधीची शेती विकसित झालेली नाही. शेतकऱ्यांनी पिंपळी, मुसळी उत्पादनासाठी अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, ते मिळणार नाही अशीच भूमिका घेतली जाते. पारदर्शकपणे कामे केल्यास वनौषधी उत्पादक शेतकरी वाढू शकतात. मात्र, फलोत्पादन मंडळ पांढरा हत्ती बनला आहे. तो पोसण्यापेक्षा त्रयस्त संस्थेला ही कामे देणे योग्य ठरेल.’’

प्रतिक्रिया
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. आमच्याकडे काहीही प्रलंबित नाही. प्रलंबित असल्याचे आढळल्यास आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिले जाईल.
- डॉ. अ.रा. हसनाबादे, प्रकल्प संचालक, फलोत्पादन मंडळ


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...