शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान नाही

शेततळे
शेततळे

पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता राज्यातील शेतकऱ्यांना नवीन श्रेणीच्या प्लॅस्टिक पेपरला अनुदान देण्यास तूर्त स्थगिती देण्यात आली.  कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाकडून शेततळे अस्तरीकरणासाठी प्लॅस्टिक पेपरला अनुदान दिले जाते. फलोत्पादन मंडळ राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविते. त्यातून संरक्षित शेतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत काही मुद्दांवर संभ्रम आहे.  आयएस १६३५२-२०१५, टाइप एक-५०० मायक्रॉन आणि आयएस २५०८-२०१६ टाइप तीन -५०० मायक्रॉन अशा दोन्ही श्रेणी अनुदानाच्या यादीतून काही दिवसांपूर्वीच हटविण्यात आल्या आहेत. “राज्यातील शेतकऱ्यांना प्लॅस्टिक पेपरसाठी अनुदान देण्याकरिता सध्या फक्त आयएस १६३५२-२०१५ टाइप एक-५०० मायक्रॉन हीच श्रेणी पात्र राहील. या श्रेणीव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्जाच्या पॉलिथिन फिल्मला अनुदान मिळणार नाही,” असे आदेश मंडळाने काढले आहेत.  “शेततळे अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना प्लॅस्टिक पेपरच्या नव्या श्रेणींना अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला गेला होता. मात्र, त्यासाठी तांत्रिक निकषांची पडताळणी झाली नव्हती. पडताळणी झाल्यानंतर फलोत्पादन मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.  उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, मंडळाचे निकष भक्कम नसतात. त्यातून धरसोड करणारे असे निर्णय घेतले जातात. “फलोत्पादन किंवा आधुनिक शेतीमधील बदलत्या तंत्राचा सतत आढावा घेणे, नव्या किंवा सुधारित उत्पादनांना अनुदानाच्या यादीत आणणे, ही प्रक्रिया सतत होणे अपेक्षित आहे. त्यात तांत्रिक निकषांबाबत तडजोड नसावी. मात्र, ही सर्व प्रक्रिया व्यक्तिकेंद्रित न ठेवता मंडळाच्या कामकाजाचा अविभाज्य भाग असावी,” असे मत उद्योजकांचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com