Agriculture news in Marathi, Subsidy of Rs. one crore seven lakh rupees to the onion farmers | Agrowon

पारनेर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात कोटी दहा लाखांचे अनुदान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नगर ः पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी १० लाख ५६ हजार ३७० रुपये कांदा अनुदान मिळाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.

नगर ः पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी १० लाख ५६ हजार ३७० रुपये कांदा अनुदान मिळाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.

कांद्याला मिळणारा दर कमी असल्याने नुकसान झाल्यामुळे कांद्याला अनुदान देण्याच्या सतत होत असलेल्या मागणीचा विचार करून शासनाने प्रथम १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीसाठी दोन रुपये प्रति किलो दराने कांदा अनुदान जाहीर केले होते. त्याचे २५५२ शेतकऱ्यांना १ कोटी ७२ लाख ९५ हजार २६८ रुपये अनुदान मंजूर होऊन ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. त्यानंतरही कांदा दरात वाढ न झाल्यामुळे शासनाने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत नंतर पुन्हा २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले होते. 

कांदा अनुदान जाहीर केलेल्या मुदतीचे प्रस्ताव १५ एप्रिल २०१९ पर्यंत स्वीकारण्यास मुदत दिली होती. त्यानंतर २० आॅगस्टच्या सभेत वरील सर्व प्रस्तावांना मान्यता दिलेली असून कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरमध्ये कांदा विक्री केलेल्या ८०३६ शेतकऱ्यांना ७ कोटी १० लाख ५६ हजार ३७० रुपये कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २००० पासून कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. 

बाजार समितीत पारनेर तालुक्यासह श्रीगोंदा, दौंड, नगर, संगमनेर, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन येत आहेत, असे माजी सभापती काशिनाथ दाते, अरुण ठाणगे, अशोक कटारिया, गंगाराम बेलकर, युवराज पाटील, अण्णासाहेब बढे, शिवाजीराव बेलकर, खंडु भाईक, सावकार बुचुडे, संगीता कावरे, राहुल जाधव, विजय पवार, राजश्री शिंदे, हर्षल भंडारी, वसंत चेडे, संभाजी आमले या संचालक मंडळाने केले आहे.


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...