पेरणे फाटा येथे उपबाजार आवार

पेरणे फाटा येथे उपबाजार आवार
पेरणे फाटा येथे उपबाजार आवार

पुणे ः पुणे- नगर महामार्गावर चंदननगर, वाघोली आणि कोरेगाव भीमा येथे रस्त्यावर होणाऱ्या शेतीमाल विक्रीला एकाच ठिकाणी आणत, शेतकरी आणि खरेदीदारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पेरणे फाटा येथे १० एकर जागेवर पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पुढाकार घेतला असून, याबाबतचे जागा मिळण्याचे पत्र बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. तर हा बाजार मांजरीच्या धर्तीवर शेतकरी आणि खरेदीदार असा करण्याचा प्रयत्न असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

पुणे शहर आणि परिसराच्या वाढत्या विस्तारामुळे शेतीमालाची मागणी वाढत आहे. यामुळे सध्या शेतकरी चंदननगर, वाघोली, लोणीकंद, पेरणे, कोरेगाव येथे महामार्गालगत भाजीपाला विक्री करत आहे. शहराच्या विस्तारापूर्वी हा भाग ग्रामीण भाग असल्याने या ठिकाणी भाजीपाला विक्री होत होती. मात्र, शहराच्या विस्तारामुळे हा परिसर शहरी झाला असून, भाजीपाल्याची मोठी मागणी वाढली आहे. यामुळे महामार्गालगत भाजीपाला विक्री होत आहे. हा बाजार एका ठिकाणी आणल्याने शेतकरी आणि खरेदीदारांना सोयीचे होणार असल्याने या ठिकाणी उपबाजार उभारण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, हा विस्कळित असलेला बाजार एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पुढाकार घेतला आहे.

मांजरीच्या धर्तीवर असावा दलालमुक्त बाजार दरम्यान पेरणे फाटा येथे उभारण्यात येणारा बाजार आवार मांजरीच्या (हडपसर) धर्तीवर शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारचा असणार असावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या बाजारात जर दलाल आडते आल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होतच राहणार असल्याने, हा बाजार शेतकऱ्यांच्या एेवजी आडते, दलालांच्या हिताचा होणार असेल तर काय उपयोगाचे? यामुळे पेरणे फाटा येथे होणारा बाजार शेतकरी आणि खरेदीदार अशा थेट व्यवस्थेचा व्हावा. अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद गद्रे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com