Agriculture news in marathi Success of closure of agricultural service centers in Solapur | Agrowon

सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद यशस्वी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या प्रकरणात कंपन्यांची जबाबदारी असताना, थेट विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस ऍण्ड सीडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आला. त्यास शुक्रवारी (ता.१०) प्रतिसाद मिळाला.

सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या प्रकरणात कंपन्यांची जबाबदारी असताना, थेट विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस ऍण्ड सीडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आला. त्यास शुक्रवारी (ता.१०) प्रतिसाद मिळाला.

पुढील तीन दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. आधीच कोरोनामुळे दुकानाच्या वेळा कमी होत्या, त्यात आता कृषि सेवा केंद्रांनी स्वतःच बंद पुकारल्याने ऐन हंगामामध्ये  शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि औषधांच्या खरेदीसाठी फटका बसला आहे. 

शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे बियाणे सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकण्याचे काम विक्रेते करतात. बियाणे न उगवण्यामध्ये  विक्रेत्यांचा काहीही संबंध येत नाही. मात्र, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे योग्य नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सगळीकडे या बंदला प्रतिसाद मिळाला.

सोलापूर शहरासह पंढरपूर, बार्शी, अकलूज, माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढ्यातील आणि ग्रामीण भागातील दुकाने बंद राहिली. आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला, पण दखल घेतली गेली नाही, त्यामुळे हा बंद करावा लागला. सरकारने सकारात्मक विचार करावा,'' असे माफदाचे भीमराव कौंडुभरी यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या...

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानातून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याची रक्कम अनेकवेळा मागणी करुनही मिळालेली नाही. विक्रेत्यांकडे मुदतबाह्य कीटकनाशकाची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे संबंधित कंपनीने ती परत घेऊन विल्हेवाट लावावी. नवीन परवाना किंवा नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारी फी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे, ती सगळीकडे समान करावी. विक्रेत्यांकडे असलेले साठा रजिस्टर संगणकीकृत पद्धतीने ठेवण्यास मान्यता द्यावी.


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...