तिवरे दुर्घटना; तेवीसपैकी सतरा मृतदेह शोधण्यात यश

तिवरे दुर्घटना; तेवीसपैकी सतरा मृतदेह शोधण्यात यश
तिवरे दुर्घटना; तेवीसपैकी सतरा मृतदेह शोधण्यात यश

रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे पायथ्याशी असलेली १२ घरे जमिनदोस्त झाली असून, २३ जण वाहून गेले होते. दोन दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेमध्ये १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलेला एकजण जिवंत सापडला आहे. नदीपात्रात गाळ असल्यामुळे शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत आहे.

अतिवृष्टीमुळे मंगळवारी (ता. २) रात्री अचानक धरण फुटले. पाण्याच्या लोंढ्यात वाटेवरील घरे, मंदिर, विद्युत खांब जमिनदोस्त झाले. अनेक ठिकाणी पाण्याने प्रवाह बदलला. त्यामुळे वाटेवरील पाच पुलांवर पाणी आले होते. भेंदवाडी आणि फणसवाडी यांना जोडणारा कॉजवे वाहून गेला. तसेच तेथून दोन मैलांच्या अंतरावरील दोन साकव पूर्णपणे नष्ट झाले. यांसह शेतीतही गाळ गेला. २० किलोमीटरच्या मार्गातील पुलांची उंची सुमारे १२ ते १३ फुटांपेक्षा अधिक आहे. या पुलांवरून पाणी गेले होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसरले असून, शोधकार्यात बाधा आलेली नाही. 

एनडीआरएफच्या जवानांकडून मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी (ता. ३) सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झालेल्यांपैकी कृष्णा चव्हाण (वय ५५) हे जिवंत आढळून आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने साचलेल्या गाळात मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहेत. तीन जणांचे मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा १७ वर पोचला आहे. अजूनही सहा जण बेपत्ता असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वतः घटनास्थळी उपस्थित आहेत.

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेतबाबत एसआयटीने संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील,  असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कामथे येथे केले. यातील मृत व्यक्तींच्या नातेवाइकास मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असेही सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. तत्पूर्वी कामथे येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी नातेवाइकांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com