agriculture news in marathi The success of the joint efforts of Mahavikas Aghadi in Deglur-Biloli election | Page 4 ||| Agrowon

देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या एकत्रित प्रयत्नांचे यश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नियोजनबद्ध आखणी करून भाजपला ‘पंढरपूर’ची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळू दिली नाही. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले.

नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नियोजनबद्ध आखणी करून कॉँग्रेससह आघाडीतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले. त्यामुळे भाजपला ‘पंढरपूर’ची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली नाही. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले.

देगलूरची पोटनिवडणुक विविध अंगानी गाजली. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबने यांना एनवेळी पक्षात घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली. यामुळे काँग्रेसपूढे तगडे आव्हान उभे राहिले. भाजपच्या उमेदवारीमुळे काँग्रेसने नियोजनबद्ध आखणी करून कॉँग्रेससह आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासह मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले.

पक्षातून भाजपत गेलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना पक्षात घेऊन बळ वाढविले. ते भूमिपुत्र असल्याने त्यांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरली. दरम्यान, मागील काळात भारिप बहुजन महासंघाने ‘किनवट’चा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. तसाच प्रयोग पुन्हा देगलूरमध्ये होईल, अशी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षा होती पण ती यशस्वी झाली नाही.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी देखील पंढरपूर पॅटर्न पुन्हा देगलूरमध्ये यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण ते देखील अयशस्वी ठरले. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी श्री. साबणे यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र त्यांचा उपयोग झाला नाही.

निकालाचे परिणाम इतर निवडणुकीत उमटणार?
जितेश अंतापूरकर नवखा असताना देखील रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे झालेले निधन आणि त्यानंतर मिळालेली मतदारांची सहानभुतीही महत्त्वाची आहे. तसेच कॉँग्रेसला राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेची मिळालेली साथ यामुळे विजय सुकर झाला. तर दुसरीकडे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवलेले माजी आमदार सुभाष साबणे यांचा मात्र पुन्हा पराभव झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता या निवडणुक निकालाचे परिणाम काय होतात, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...