दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ठिकठिकाणी विजय संपादन केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महाविकास आघाडी एकत्र लढल्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ठिकठिकाणी विजय संपादन केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महाविकास आघाडी एकत्र लढल्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. भाजपने आपले गड राखण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले असून, आता सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
गेले पंधरा दिवस सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी (ता. १८) निकालानंतर संपली. वऱ्हाडात सुमारे ८९३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. तालुकास्तरावर मतमोजणीसाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
यंदाच्या निवडणुकीत ठिकठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले. तर विरोधात भाजप पुरस्कृत पॅनेल रिंगणात होते. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनेही पॅनेल उभे करीत लढत दिली. अनेक ठिकाणी तिरंगी लढती झाल्याचा परिणाम निकालातून दिसून आला.
अकोला जिल्ह्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावात त्यांच्या पॅनेलने यश मिळवले. भाजपने अकोला जिल्ह्यातील पळसो बढे, चिखलगाव, निमकर्दा, भांबेरी, चोहोट्टाबाजार, उरळ, शिंदखेड, लोहगड, टिटवा, भटोरी लाखपुरी, शिरपूर, जामठी, आलेगाव आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावल्याचा दावा केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा मतदारसंघात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची घौडदौड सुरू आहे. साखरखेर्डा ग्रामपंचायतीत शिवसेनेचा केला पराभव झाला आहे. शेंदूर्जन ग्रामपंचायतीत पॅनेल विजयी झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात धाड, देऊळघाट या मोठ्या ग्रामपंचायतीत चुरशीची लढत झाली. मोताळा तालुक्यातील आदर्शग्राम सिंदखेड लपाली येथे विद्यमान सरपंच कदम गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले. वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदारांनी परिवर्तन घडवून आणले आहे. मालेगाव, रिसोड, वाशीम तालुक्यात ठिकठिकाणी चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या.
विजयाचा जल्लोश
ग्रामपंचायत निवडणूक यंदा चुरशीची झाल्याने विजयानंतर उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोश केला. या सर्वत्र गुलाल उधळला जात होता. मिरवणुकांवर बंदी असल्याने वाद्ये नसली तरी उमेदवारांनी गल्लोगल्ली फिरून मतदारांचे आभार मानले.
- 1 of 1054
- ››