नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात बियाणेनिर्मिताला यश
येथील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने तयार केलेल्या रत्नागिरी ८, रत्नागिरी ६, रत्नागिरी १, या जातीच्या भाताचे बियाणे निर्मितीसाठी केलेल्या लागवडीतून यंदा विक्रमी उत्पादन घेण्यात आले.
रत्नागिरी : येथील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने तयार केलेल्या रत्नागिरी ८, रत्नागिरी ६, रत्नागिरी १, या जातीच्या भाताचे बियाणे निर्मितीसाठी केलेल्या लागवडीतून यंदा विक्रमी उत्पादन घेण्यात आले.
जिल्ह्यातील ५५ शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले होते. १६ हेक्टर क्षेत्रातून ३४० क्विंटल भात बियाणे कृषी संशोधन केंद्राला मिळाले. या माध्यमातून बियाण्यांची साखळी (सीड चेन) तयार करण्यात यश आल्याचे संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी सांगितले.
बीजोत्पादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील गणेश गुळे, बसणी, कोतवडे, वेतोशी, मेर्वी, शिरगाव, नेवरे, रिळ, कासारवेली, पुर्णगड, गोळप, आसगे (ता. लांजा), कोळवण (जि. सिंधुदुर्ग) येथील शेतकऱ्यांच्या शेतावर बियाण्यांचे उत्पादन घेण्यात आले. या बियाण्यावर प्रक्रिया सुरू असून, मे महिन्यात पुन्हा शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून नफा ना तोटा या तत्त्वावर विद्यापीठाने ठरवून दिलेला भात बियाण्याचा दर शेतकऱ्यांना देण्यात आला. बारीक जातीच्या बियाण्याला प्रती किलो ३० रुपये तर जाड दाण्यासाठी २८ रुपये भाव दिला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर हे बियाण्यांचे वाण घेताना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत होते. संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर वाणाची निर्मिती केली आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली करून तपासणी केली जात होते. कीड, रोग यांच्यावर माहिती देण्यात येत होती. सीड चेन हा विद्यापीठाचा उद्देश सफल व्हावा यासाठी जे शेतकरी या यामध्ये सहभागी आहेत, त्या शेतकऱ्यांना भात शेतीविषयी संशोधन केंद्राकडून प्रशिक्षणही दिले होते. शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात आले होते. जास्त उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात आपल्याला ठेवून उर्वरित भात कृषी संशोधन केंद्राला दिले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश काशिनाथ शेट्ये यांनी रत्नागिरी ८, या बारीक जातीच्या बियाण्याचे ६.६ टन प्रती हेक्टरवर उत्पादन घेतले. रिळ येथील मिलिंद वैद्य यांनी प्रती हेक्टरी ६.१ टन उत्पादन घेतले. सर्व शेतकऱ्यांचे २०० किलोपासून तीन टनांपर्यत उत्पादन वाढले आहे.
प्रतिक्रिया
सीड चेनसाठी दहा गुठ्यांत शेतकऱ्यांनी भात बियाणे तयार केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले. विद्यापीठाचा ना नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी सीड चेन सफल झाली आहे. उत्पादन वाढीसाठी संशोधन केंद्रातील बियाणे उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मे महिन्यात शिरगाव कृषी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा.
- डॉ. भरत वाघमोडे, संशोधक, शिरगाव भात संशोधन केंद्र.
- 1 of 1028
- ››