agriculture news in Marathi, success story of Abasaheb Bhosle,Kolwad,Dist.Satara | Agrowon

आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टर

विकास जाधव
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलवडी (जि. सातारा) येथील युवा शेतकरी आबासाहेब हणमंतराव भोसले. ‘एमएस्सी’ कृषीचे शिक्षण घेतलेल्या भोसले यांनी दुष्काळी भागात ग्लॅडिओलस फूलपीक यशस्वी करून त्यात मास्टरी संपादन केली आहे. बाजारपेठेतील मागणी ओळखून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड व उत्तम व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे.  

अभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलवडी (जि. सातारा) येथील युवा शेतकरी आबासाहेब हणमंतराव भोसले. ‘एमएस्सी’ कृषीचे शिक्षण घेतलेल्या भोसले यांनी दुष्काळी भागात ग्लॅडिओलस फूलपीक यशस्वी करून त्यात मास्टरी संपादन केली आहे. बाजारपेठेतील मागणी ओळखून वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड व उत्तम व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे.  

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा दुष्काळी आहे. मात्र याच परिसरातील काही गावातील शेतकरी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून चांगली शेती करीत आहेत. प्रामुख्याने या परिसरात फूलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तालुक्यातील कोलवडी या कमी पर्जन्यमान असलेल्या गावात आबासाहेब हणमंतराव भोसले यांची सुमारे १८ एकर शेती आहे. त्यांनी कृषी विषयातील पदव्युतर पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर काही काळ ते स्पर्धा परीक्षांतही रमले. मात्र शेतीतच करिअर करायचा इरादा पक्का केला. 

सुरवातीचे प्रयोग 
घरची अवघी दीड एकर शेती होती. पारंपरिक शेतीला फाटा देत भोसले यांनी आधुनिक शेतीची कास धरली. जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आले पिकाची दीड एकरात लागवड केली. १०४ गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) उत्पादन व प्रति गाडी सरासरी ४६ हजार रुपये दर मिळाला. पहिल्याच प्रयोगात उल्लेखनीय यश मिळाल्याने उत्साह वाढला. मिळालेले उत्पन्न व कर्ज काढून जमीन खरेदी करण्यास सुवात केली. टप्पाटप्प्याने कोलवडी येथे साडेचार एकर, पाडळी स्टेशन येथे सात एकर अशी शेती घेतली. सन २००२ च्या दरम्यान २० गुंठ्यात झेंडू, ग्लॅडिओलस व पपई अशी मिश्रपीक पद्धती घेत उत्पन्न वाढवण्यावर भर दिला. कलिंगड, खरबूज, ब्याडगी मिरची, गुलछडी, लिली, स्ट्रॅाबेरी, टोमॅटो, वांगी, ऊस अशी विविध पिके घेणे सुरू होते. रोपवाटिकाही सुरू केली. शेतीच्या कडेला आंबा, आवळा, सीताफळ, नारळ, रामफळ आदी झाडे लावली. तसेच ७० बाय ४० फूट शेततळे घेतले. त्यात मत्स्यशेती केली जाते. जीवामृत, गांडूळ खतनिर्मिती होते. 

ग्लॅडिओलसची शेती 
 सन २००१ मध्ये ७० गुंठ्यात झेंडू, पपई पिके घेतली जायची. यात ग्लॅडिओलसचे आंतरपीक घेतले. त्यासाठी नेदरलॅंडहून पांढऱ्या व पिवळ्या रंगांचे एकूण साडेचार हजार कंद मध्यस्थ कंपनीकडून आयात केले. अभ्यास व ज्ञानवृध्दी सुरू होती. दरम्यान गारांचा पाऊस झाल्याने पपई नुकसानीत गेली. दर न मिळाल्याने झेंडू परवडला नाही. आंतरपिक ग्लॅडिओलसने मात्र चांगला आधार दिला. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर, बाजारात वर्षभर मागणी, रोगाला कमी बळी पडणारे, कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे अशा विविध बाजूंनी हे पीक आश्वासक वाटले. मग त्यावर लक्ष केंद्रित करून क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. 

मदत व मार्गदर्शन
आबासाहेबांना आई, पत्नी नीलम यांची मदत होते. बंधू विजय यांचे कृषी सेवा केंद्र आहे. फूलशेतीत दहा ते बारा कामगार कायमस्वरूपी आहेत. ते ॲग्रोवनचे नियमित वाचक असून त्याद्वारे तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याचे ते सांगतात. स्वतःला ज्ञानाबाबत कायम अपडेट ठेवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी- पुणे, हैदराबाद तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे आयोजित विविध प्रशिक्षणांत त्यांनी सहभाग घेतला आहे. 

ग्लॅडिओलस शेतीमधील ठळक बाबी 

 • बाजारपेठेची मागणी ओळखून म्हणजेच सणवार, लग्नसराईनुसार वर्षभरात रोटेशन पद्धतीने म्हणजे टप्प्याटप्प्याने लागवड. एकूण क्षेत्र पाच- सहा एकर 
 • ६० ते ६५ दिवसांनी फुले येण्यास सुरवात  
 • एकरी ८० हजार ते एक लाख कंदांची लागवड  
 • दर तीन वर्षांनी बियाणे बदल करण्यासाठी परदेशातून कंद मागविले जातात. 
 • बहर सुरू झाल्यावर एक आड दिवस फुलांची तोडणी  
 • कळी अवस्थेत चार ते पाच पाने ठेऊन काडी कट केली जाते.  
 • ५० दांड्यांचे प्रति बंडल करून त्याला तीन ठिकाणी बांधले जाते. दहा बंडल एकत्र करून बारदानातून मार्केटला पाठविले जातात. 
 • कंदांची काढणी झाल्यांनतर तीन महिने शीतगृहात. प्रति ५० किलो पोत्यामागे महिन्याला २५ रुपये शुल्क.   सुमारे १८ वर्षांपासून ग्लॅडिओलसचा अनुभव. त्यामुळे पिकात हातखंडा व बाजारपेठेत ओळख. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून कायम मागणी.    

उत्पादन व खर्च  
लागवडीसाठी एकरी ८० हजार ते एक लाख कंद लागतात. लागवडीपासून ते काढणीपर्यंत मजुरी, खते, कीडनाशके, पॅकिंग, वाहतूक असा खर्च किमान ५० हजार रुपये असतो. एक एकरातून ससरारी ७५ हजार ते ८० हजार काड्यांचे (स्टेम) उत्पादन मिळते. प्रति काडी सरासरी चार ते पाच रुपये दर मिळतो. पितृपंधरवड्यात हाच दर दोन रुपये तर लग्नसराई, सणवार किंवा विशेष दिन या वेळी तो सहा-सात ते दहा रुपयांपर्यंत मिळतो. पहिल्या वर्षी प्रति कंद साडेतीन ते चार रुपयांप्रमाणे घ्यावे लागतात. त्यांचा एकरी खर्च साडे तीन लाख रुपयांपर्यंत असतो. मात्र पुढील वर्षांपासून कंदनिर्मिती आपल्याच शेतात होऊ लागल्याने त्यावरील खर्चात पुढील तीन ते पाच वर्षांपर्यंत तरी बचत होऊ शकते. 

स्वयंचलित ठिबक यंत्रणा
भोसले यांनी आधुनिक शेती करण्यावर भर दिला आहे. आपल्या सात एकरांत स्वयंचलित ठिबक यंत्रणा बसविली आहे. सिंचन व पाणी व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याने त्यासंबंधीचे विविध प्रयोग त्यांच्या शेतात सुरू असतात.  

पुरस्कार

 •   सातारा जिल्हा परिषदेचा डॉ. जे. के. बसू सेंद्रिय व आधुनिक शेती - प्रथम क्रमांक
 •   कराड येथील यशवंत कृषी व औद्योगिक व पशूपक्षी प्रदर्शनात ग्लॅडिओलस पिकाला २०१८ मध्ये प्रथम तर २००५ व २००९ मध्ये द्वितीय क्रमांक, पुणे येथील सेवर फलोत्सवात प्रथम क्रमांक
 •   अजिंक्यतारा शेतकरी फळे, फुले व भाजीपाला संस्थेच्या वतीने आयोजित निसर्ग राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात निसर्ग गौरव पुरस्कार  

 

- आबासाहेब भोसले, ९८२२३९३९८४ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बेशिस्त म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध...मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३०२; २३...मुंबई : मंगळवारी (ता.३१) एकाच दिवशी तब्बल ८२ नवीन...
मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘...मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार...
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ...पुणे : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर...
समन्वय साधत नगर बाजार समिती सुरूनगर ः प्रयत्न करुनही गर्दी कमी होत नसल्याने...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे: उन्हाच्या झळा वाढू लागल्याने राज्याच्या...
सीसीआयला केंद्राकडून १०५९ कोटींचा...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक...
अवजारे उद्योगाला लॉकडाऊनमधून सूट नाही पुणे: कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके...
‘कोरोना’च्या राज्यात दिवसाला ५५००...मुंबई : राज्यात ‘कोरोना’ चाचण्यांची सुविधा देशात...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमीच्या सरी पुणे: राज्यात पुर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचे सत्र...
थेट विक्रीसाठी शेतकरी, गटांचा सहभाग...औरंगाबाद: शहरातील ग्राहकांकडून संचार बंदीच्या...
अतिरिक्त दूध शासन खरेदी करणार पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...