agriculture news in Marathi, success story of bitter gourd cultivation, Ramdas patil,Karaj,Dist.Jalgaon | Agrowon

केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोग

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 23 जुलै 2019

जळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील यांनी आपल्या वीस एकरांत केळी व कापूस अशी मुख्य पीकपद्धती ठेवली आहे. केळीची दोन हंगामात लागवड होत असून, दोन्ही हंगामात ते कारले पिकाचे आंतरपीक घेतात. सुमारे सात-आठ वर्षांपासून या पद्धतीत सातत्य ठेवत दोन्ही हंगामातील आंतरपिकांमधून त्यांनी उत्पन्नाचा सक्षम आधार शोधला आहे. त्यातून केळी या मुख्य पिकाचा उत्पादनखर्चही कमी होण्यास मदत झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील यांनी आपल्या वीस एकरांत केळी व कापूस अशी मुख्य पीकपद्धती ठेवली आहे. केळीची दोन हंगामात लागवड होत असून, दोन्ही हंगामात ते कारले पिकाचे आंतरपीक घेतात. सुमारे सात-आठ वर्षांपासून या पद्धतीत सातत्य ठेवत दोन्ही हंगामातील आंतरपिकांमधून त्यांनी उत्पन्नाचा सक्षम आधार शोधला आहे. त्यातून केळी या मुख्य पिकाचा उत्पादनखर्चही कमी होण्यास मदत झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील करंज (ता. जळगाव) हे गाव तापी नदीकाठी आहे. काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन या भागात आढळते. येथील परिसरात केळीचे क्षेत्र अधिक असून त्याखालोखाल भाजीपाला, कापसाची शेती आहे. गावातील रामदास पाटील यांची करंज शिवारात तीन ठिकाणी मिळून सुमार २० एकर शेती आहे. मुलगा राजेंद्रदेखील पूर्णवेळ शेतीतच आहे. 

पाटील यांच्या शेतीचे नियोजन 
पाटील आपल्या शेतीतील सिंचनासाठी तीन कूपनलिकांचा वापर करतात. केळी व कापूस ही त्यांची प्रमुख पिके आहेत. दरवर्षी सुमारे ८ ते १० एकरांत नोव्हेंबरच्या दरम्यानची केळी लागवड असते. तर पाच ते सात एकरांत बीटी कापूस असतो. काही क्षेत्र मक्याचे असते. मुख्य पिकात आंतरपीक घेतल्यास त्यापासून उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. त्याबाबत आपल्या नातेवाइकांकडून त्यांना अधिक मार्गदर्शन मिळाले. सुरुवातीचा नोव्हेंबरची केळी लागवड व त्याच वेळी कारले लागवड असा प्रयोग त्यांनी सुरू केला. ही शेती त्यांना आर्थिक दृष्ट्या योग्य वाटू लागली. नंतरच्या वर्षात क्षेत्र चार एकरांपर्यंत वाढविले. अशा रीतीने त्यांनी केळी व त्यात कारले आंतरपीक असे दोन हंगाम देखील निवडले. नोव्हेंबरचा एक हंगाम व फेब्रुवारीतील दुसरा हंगाम अशी ही पद्धती आहे.  

व्यवस्थापनातील बाबी 
उतीसंवर्धित केळीची लागवड पाच बाय साडेचार फूट अंतरावर असते. केळीच्या दोन ओळींमधील पाच फुटांच्या क्षेत्रात कारल्याची प्रत्येकी दीड फुटावर लागवड केली जाते. कारल्याच्या संकरित वाणाचा वापर होतो. ठिबकद्वारे पाणी दिल्याने वाफसा व्यवस्थित राहतो. केळी लागवडीनंतर महिनाभरात खोडांनजीक सुमारे १० एकरात २५ ते ३० ट्रॉली प्रमाणात शेणखताचा वापर केला जातो. त्याचा उपयोग कारली पिकासाठी देखील होतो. शिवाय कारल्याचे वेल उन्हाळ्यात केळी पिकासाठी नैसर्गिक आच्छादन म्हणूनही महत्त्वाचे ठरतात. पाण्याचा वापर कमी होऊन वाफसा टिकून राहण्यास मदत होते.  

कारल्याची काढणी व विक्री

  •   बी लागवडीपासून साधारण दोन ते अडीच महिन्यांनी कारल्याचा प्लॉट सुरू होतो. तो पुढे एक महिना व्यवस्थित चालतो. क्षेत्र अधिक असल्याने साधारण सात दिवसांपर्यंत काढणी चालते. 
  •   काढणीसाठी दररोज सुमारे १० मजुरांची गरज भासते. दोन सालगडी आहेत. त्यांची मदत होते. 
  •   कारल्यांची साठवणूक तागाच्या ओल्या गोण्यांवर घरीच एका खोलीत केली जाते. विक्री जळगाव येथील बाजार समितीत केली जाते. दररोज पहाटे गावातून प्लॅस्टिकच्या २० किलो पॅकिंगमधून कारल्यांची पाठवणूक होते हंगाम व आवकेनुसार किलोला ३० रुपयांपासून ते ४०, ४५ रुपयांपर्यंत दर मिळतात. मागील नोव्हेंबर हंगामात सहा एकरांत १३०० पन्नी (प्रति पन्नी २२) किलोपर्यंत उत्पादन मिळाल्याचे पाटील म्हणाले. दोन हंगामांपैकी नोव्हेंबर हंगामातील कारल्याला अधिक दर असतात. 
  •   एकरी उत्पादन चार ते पाच टनांपर्यंत मिळते. कारल्याच्या प्रत्येक हंगामात साधारण ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत एकरी उत्पन्न मिळते. उत्पादनखर्च एकरी किमान ५० हजार रुपये असतो. 
  •   केळीची साधारण १८ ते २० किलोची रास मिळते. कारल्यातून केळीचा उत्पादनखर्च कमी होतो. 

कापूस पिकातही कारली व काकडी
पाटील यांनी कापसातही काकडी लागवड दोन वर्षांपासून सुरू केली आहे. कापसाची लागवड चार बाय साडेतीन फुटांत आहे. कापसाच्या दोन ओळींमधील क्षेत्रात कारली व काकडीचे वेल पसरत आहेत. अतिपावसात वेलांचे नुकसान होऊ नये यासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात ही लागवड केली आहे. चार वर्षांपूर्वी केळीत चवळीचाही प्रयोगही केला होता. परंतु केळीत चवळी हवी तशी जोमात वाढत नसल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदविले.  

गावरान कारल्याला अधिक उठाव
सुमारे ५० वर्षांपासून जळगाव बाजार समितीत आडतदार असलेले अश्‍विन पाटील म्हणाले की या बाजार समितीत वर्षभर कारल्याची आवक होत असते. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आवकेचे प्रमाण वर्षातील अन्य काळातील तुलनेने जास्त असते. साहजिकच त्या काळात दर कमी असतात. ते साधारण किलोला १५ ते २५ रुपये या दरम्यान राहतात. मात्र सध्याच्या जुलै काळात आवक कमी असल्याने दर मात्र चांगले मिळतात. आवकेतील कारल्यात संकरित व गावरान असे दोन प्रकार येतात. सर्वांत जास्त उठाव गावरान कारल्याला असतो. सध्या संकरित कारल्याचे दर प्रति किलो ३०, ३५ ते ४० रुपयांपर्यंत आहेत. त्याचवेळी गावरान कारल्याचे दर ५० रुपये सुरू आहेत. या कारल्याला किलोमागे १० रुपये दर जास्तच मिळतात. सध्या दररोजची आवक सांगायची तर संकरित कारल्याची ८ ते १० क्विंटलपर्यंत तर गावरानची साधारण चार ते पाच क्विंटलपर्यंत आहे. या बाजार समितीत जळगाव जिल्ह्यासह धुळे, नाशिक आणि मध्य प्रदेशातील काही भागांतून कारले येते.

रामदास पाटील, ९६६५६९४०५९
राजेंद्र पाटील, ९७३०७३७९५० 

 

 

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...
व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब उत्पादक झाले...तोंडावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या...
दर पडले? चिंता नको इंगळे घेऊन आले...शेतकऱ्यांच्या मालाला अनेक वेळा समाधानकारक दर मिळत...