Agriculture news in marathi success story of citrus selling in lockdown | Agrowon

मोसंबी विक्रीसह साधला सेवाभावही...

सतीश कुलकर्णी
सोमवार, 18 मे 2020

सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सर्व काही बंद असलेल्या काळामध्ये शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामध्ये गोरेगाव(पूर्व), मुंबई येथील काही वसाहतींमध्ये फळांच्या विक्रीचा एक अनोखा प्रयोग अजित वर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवला. या सहकारी सोसायट्यातील विक्रीबरोबरच परिसरातील ८ पोलिस स्टेशन, तीन रुग्णालयात कार्यरत कोरोना योद्धे आणि विविध आजाराने ग्रस्त रुग्ण, अंध व मुलांना मोसंबीचे मोफत वाटप केले.

सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सर्व काही बंद असलेल्या काळामध्ये शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामध्ये गोरेगाव(पूर्व), मुंबई येथील काही वसाहतींमध्ये फळांच्या विक्रीचा एक अनोखा प्रयोग अजित वर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवला. या सहकारी सोसायट्यातील विक्रीबरोबरच परिसरातील ८ पोलिस स्टेशन, तीन रुग्णालयात कार्यरत कोरोना योद्धे आणि विविध आजाराने ग्रस्त रुग्ण, अंध व मुलांना मोसंबीचे मोफत वाटप केले.

सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये सर्व काही बंद असलेल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्रिवर विविध मर्यादा आल्या. अनेकांना मजूरांच्या अभावी मालच काढता आला नाही. काढलेल्या मालांला व्यापारी पडलेल्या दरामध्ये मागत आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्याच्या विविध बातम्या गोरेगाव (पूर्व) येथील संगणक तज्ज्ञ असलेल्या अजित वर्तक व त्यांच्या मित्रांच्या कानी येत होत्या.

अशी कल्पना आली मनात
गेल्या काही वर्षापासून पुणे येथे सेंद्रिय भाजीपाला पुरवठ्याची साखळी बसवण्याचा अजित वर्तक आणि शैलेश डोंगरे यांचा प्रयत्न चालू आहे. ९ एप्रिल रोजी एका अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचा मोसंबी विक्रीसंदर्भात फोन आला. आधी नकार दिला तरी शेतकऱ्याची काकुळती पाहता आपणच फळे आणून इथे खपवण्याचा विचार अजित यांच्या मनात आला. बाजारात १२० रुपये किलो दराने मोसंबी असताना थेट आणल्यास आपण १०० रुपये किलोने नक्कीच देऊ शकू, हा विश्वास अजित यांना वाटत होता. काही मित्रांना फोन करून त्यांनी अंदाज घेतला.

विक्री व वाटपाची धडपड

 • सामाजिक माध्यमातून सुमारे १५ ते २० मित्रांना त्यांच्या सोसायटीमध्ये फळांच्या विक्रीसाठी मेसेज पाठवला. त्यातील एकाचाही रिप्लाय आला नाही. शेवटी बऱ्याच फोनाफोनीनंतर पहिल्या टप्प्यात ५० डझनची ऑर्डर हाती आली. एका बाजूला २५० डझन ऑर्डर मिळवण्याकरता प्रयत्न सुरू केले. दुसऱ्या बाजूला जिथे मोफत फळांचे वाटप करावयाचे आहे, अशा खासगी रुग्णालये, पोलिस यंत्रणा यांच्याशी संपर्क साधू लागले. गोरेगावातील संघचालक, नाना पालकर स्मृती समितीचे महाडिक यांच्याशी बोललो. महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जोगेश्वरी-गोरेगाव येथील इस्पितळामध्ये मोसंबी मोफत देण्याविषयी बोलून घेतले.
 • आदल्या दिवशी ज्यांनी नकार घंटा वाजवल्या होत्या, त्यांच्या सोसायट्यामधूनही चांगला प्रतिसाद मिळाला. १५ एप्रिल पर्यंत एकूण १३ सोसायट्यामधून ३७० डझन पेक्षा अधिक ऑर्डर पक्क्या झाल्या. नाना पालकर स्मृति समिति व वाडिया हॉस्पिटलचा स्टाफ आणि भोईवाडा पोलिस चौकी असे साधारण ९०० लोक होत असल्याचे लक्षात आले. मग शेतकऱ्याशी बोलून ऑर्डर ८०० डझनची केली. फळांच्या वाटपाचे अगदी सोसायटीच्या प्रतिनिधी, मोबाईल क्रमांकासह यादी बनवली. मोफत वाटपाच्या संस्था व पोलिस स्टेशन अशा ठिकाणी एकूण संख्येनुसार वाटपाचे नियोजन केले. मात्र, ऐनवेळी शेतकऱ्यांनी ड्रायव्हर व गाडी उपलब्ध होत नसल्याने माल पाठवणे शक्य नसल्याचे सांगत फोन बंद केला. ड्रायव्हरच्या गावातील लोकांनी न जाण्याविषयी दडपण आणले होते. सर्व विक्रीचे नियोजन ठरल्यानंतर शेतकऱ्याने ऑर्डर रद्द केल्याने मनस्ताप झाला.  मित्राने सुचवलेल्या “महाराष्ट्र मोसंबी शेतकरी” या फेसबुक पेजवरील शेतकऱ्यांसह विविध शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, शेतकरी अव्वाच्या सव्वा भाव सांगू लागले.
 • पुणे येथे आयटी इंजिनिअर मित्राची परभणीला शेती होती. त्यांच्या वडिलाशी संपर्क साधला असता ८०० डझन मोसंबी देणे शक्य असल्याचे सांगितले. तेथून माल आणण्यासाठी गाडी व ड्रायव्हर मिळवण्यासाठी एका निसर्गोपचार करणाऱ्या मित्राची मदत झाली. या सगळ्या गडबडीत २४ एप्रिल उजाडले. ॲडव्हान्स पाठवताना शेतकरी एकदम १००० डझन मोसंबी पाठवणार असल्याचे समजले. वर्तक हादरलेच. कारण ऑर्डर होती ८५० डझनची. मात्र, शेतकऱ्याच्या भावाला नुकताच मुलगा झाल्याने वरील दीडशे डझन मोफत वाटण्यासाठी पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा जीव भांड्यात पडला.
 • शेवटी २६ एप्रिल सकाळी सहाच्या दरम्यान नाना पालकर संस्थेमध्ये मोसंबी पोचली. पुढे स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा हॉस्पिटल मध्ये मोसंबी उतरवली. . गोरेगाव ते बोरीवली ह्या परिसरात वाटायची मोसंबी दोघांच्या गाडीत प्रत्येकी १३० डझन भरली. पुढे प्रत्येक सोसायटीजवळ स्वयंसेवकांच्या गाड्या ‘गाडी टू ‘गाडी’ ट्रान्सफरने भरल्या. जवळपास अर्ध्या तासात आम्ही २ टन माल खाली केला. साधारण ९ च्या सुमारास दोन गाड्यातून वर्तक आपल्या दोन मित्र व नाना पालकरचे कृष्णा महाडिक यांच्यासह वाटपाला निघाले.

२६ मार्चचा मोसंबी विक्रीचा प्रयोग

 • दोन टन (१००० डझन) मोसंबी.
 • या उपक्रमात गोरेगाव पूर्व येथील २२ गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घेतला. एकूण ५२७ डझन मोसंबी विक्री झाली.
 • ४७३ डझन मोसंबींचे मोफत वाटप ः १२०० पोलीस (गोरेगाव ते बोरिवली परिसरातील दिंडोशी पोलीस स्टेशन, त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशन, बोरीवली पोलीस स्टेशन, नॅशनल पार्क गेट पोलिस चौकी, मागाठणे डेपो पोलिस चौकी, कांदिवली ठाकूर व्हिलेज पोलीस चौकी, समता नगर पोलीस स्टेशन, कुरार पोलिस स्टेशन, भोईवाडा पोलीस स्टेशन अशा ८ पोलीस स्टेशन व ६ नाके), ३ रुग्णालय (१००० रुग्ण व वैद्यकीय सेवक) व अंधजनांच्या एका संस्था.
 • शेतकऱ्याची ठरलेली रक्कम, वाहतूक खर्च व वाटपाचा किरकोळ खर्च वगळता शिल्लक राहिलेली रक्कम - २७०० रु.
 • या शिल्लक रकमेमध्ये स्वतःच्या १०० रुपयांची भर घालून, गोरेगाव येथील उत्कर्ष संस्थेला धान्यवाटप योजनेसाठी देऊन टाकले.

१० मे रोजी राबवला असाच उपक्रम
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद व परभणीच्या शेतकऱ्याने विक्रीसाठी पुन्हा केलेली विचारणा यामुळे १० मे रोजी पुन्हा हा उपक्रम राबवला.

 • २ टनापेक्षा थोडी जास्त (११०० डझन) मोसंबी आणली.
 • गोरेगाव, चेंबूर व बोरीवली (पश्चिम) येथील एकूण ४० पेक्षा गृहनिर्माण वसाहतींचा सहभाग.
 • ६४५ डझन मोसंबीची विक्री, तर ४५५ डझन मोसंबी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था व वैयक्तिक स्वयंसेवकांमार्फत गरजू लोकांपर्यंत पोचवली.
 • विक्रीतून शिल्लक राहिलेल्या २६०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोसंबी काढणसाठी ७ मजूर कुटुंबीयांना तेथील शेतकऱ्यांकरवी वाटप.
 • गोरेगावात गोगटेवाडी, देवीची चाळ, गणेश मार्केट चाळ, वीटभट्टी व दिंडोशी वाडी, चेकनाका सर्वोदय नगर व आरे कॉलनीतील मोराचा पाडा येथे ५०० पेक्षा अधिक घरात मोसंबी वाटप.
 • महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना साबण, टॉवेल या सोबत मोसंबी वाटप.
 • बोरीवली पश्चिम लोकमान्य नगर मध्ये शीतला शंकर मंदिर कम्युनिटी किचन येथून ६०० पाकिटांसोबत व अटल स्मृती उद्यानमधून जेष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या डब्यांबरोबर एकेक मोसंबी देण्यात आली.
 • कांदिवली पोलीस स्टेशन, बोरीवली फायर ब्रिगेड ऑफिस आणि बोरीवली पश्चिम महानगर पालिकेच्या दवाखाना एकूण ११०० लोकांना मोफत वाटप झाले.
 • नाना पालकर स्मृती समिती तर्फे तेथील टाटा हॉस्पिटल मधील कॅन्सर पेशंट व त्यांचे काळजी घेणारे एकूण २५० लोक , सेंट जोन्स हॉस्पिटल येथील करोना वॉर्ड मधील डॉक्टर , रुग्ण सेवक ,अन्य सेवक व रुग्ण असे जवळपास १६०० लोक व वाडिया हॉस्पिटल मधील लहान मुलांच्या विभागातील रुग्णसेवा देणारे व मुले असे २५० लोकांना मोसंबी वाटप करण्यात आले. विक्रीतून शिल्लक २२५० रुपयांतून चेंबूर येथील मोलमजुरी करणाऱ्यांना रेशन कीट दिले.

संपर्क - अजित वर्तक, ८०९७७९६०७०
शैलेश डोंगरे, ९४२२५२२७५२
( संगणक तज्ज्ञ व सेंद्रिय भाजीपाला पुरवठा करणाऱ्या ‘ऑनेस्टवर्ल्ड’ या संस्थेचे संचालक.)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...
लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले...पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सोई-सुविधा...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
बारमाही भाजीपाला उत्पादनातून नियमित...सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या...
शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग ठरतेय फायदेशीरकेवळ पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न हाती येत...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
देशी गोपालनाचा शेतीला मिळाला आधारकातरखडक (ता. मुळशी, जि.पुणे) येथील राणी संतोष...
फळबागेने दिली आर्थिक स्थिरतासुदाम देवराव शिंदे यांनी वरुडी (जि. जालना) येथील...
कृषी पर्यटन केंद्र बनलंय तंत्रज्ञान...कुंभारगाव (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
आग्या मधमाशी संवर्धनासोबतच स्थानिकांना...परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे...
महिला गटांना मिळाली 'प्रेरणा'रामनगर (ता.जि.जालना) येथील सौ.उषा संदीपान चव्हाण-...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपळासखेडा (ता.जामनेर, जि.जळगाव) येथील राहुल पाटील...
मिश्र पीक पद्धतीतून सावरले बरडे कुटुंबीयजेव्हा यश येते, तेव्हा सर्वजण आपल्या आनंदात सामील...