औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक शेती

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील रानावनात, वन्य प्रदेशात वा डोंगरदऱ्यांत आढळणारे करटोलेचे पीक आता औरंगाबाद जिल्ह्यात रुजू पाहते आहे. जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी या पिकाची प्रायोगिक शेती केली आहे.
Milind Kulkarni showing off Spiny gourd in his farm
Milind Kulkarni showing off Spiny gourd in his farm

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील रानावनात, वन्य प्रदेशात वा डोंगरदऱ्यांत आढळणारे करटोलेचे पीक आता औरंगाबाद जिल्ह्यात रुजू पाहते आहे. जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी या पिकाची प्रायोगिक शेती केली आहे. कमी देखभाल खर्चात कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्याचा अनुभव या शेतकऱ्यांना आला आहे.  ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, धुळे, व विदर्भातील काही जिल्ह्यांतील वन्य, डोंगराळ भागात करटोलीचे पीक आढळून येते. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील चांभारवाडी येथील मिलिंद कुलकर्णी, बरकतपूर (ता. कन्नड) येथील भक्तराज मुळे व फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील कृष्णा फलके यांनीही करटुले पिकाची लागवड केली आहे. पदवीचे शिक्षण घेतलेले मुळे १९ वर्षांपासून शेती करतात. सहा एकरांत कापूस, मका, करटोले, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी व जनावरांसाठी मेथी घास व मका अशी साधारण पीक पद्धती असते. सिंचनासाठी दोन विहिरी. गेल्यावर्षी पासून पाणी आटलेले नाही. एरवी टंचाई काळात एप्रिलपासून शेतीला पाणी मिळणे मुश्कील असते.   बियाण्याला चांगली मागणी मुळे यांच्याकडील बियाण्याला धुळे, यवतमाळ, नंदूरबार, पुणे, वर्धा आदी ठिकाणावरून मोठी मागणी आली आहे. अर्धा ते एक किलो या प्रमाणात बियाणे शेतकरी नेत आहेत. या पिकाचा कीड-रोगांचा प्रादुर्भावही अत्यंत कमी असल्याचे मुळे सांगतात. तीन वर्षांत फळमाशीची समस्या मात्र उद्भवली. मात्र सापळे लावून ती नियंत्रणात आणल्याचे ते सांगतात. काढणीनंतर कंद सुप्तावस्थेत जात असल्याने त्यास पाण्याची गरज पडत नसल्याचे मुळे सांगतात.  -भक्तराज मुळे- ९७३०३४४०७३    पिकाने वाढवला उत्साह कृष्णा फलके म्हणतात की पीक पद्धतीतील बदलातून अर्धा एकरावर केलेली करटोलीची लागवड शेतीतील उत्साह वाढवून गेली. त्यांनी गेल्यावर्षी रानातून बिया जमा करत एक गुंठ्यात बीजोत्पादनासाठी लागवड केली. त्यातून यंदाच्या हंगामात १५ मेला लागवड केली. चार बाय सव्वा मीटर अंतरावर लागवड केलेल्या या करटोलीचे दीड महिन्यांत उत्पादन सुरू झाले. जून ते ऑगस्ट दरम्यान पाच तोडे झाले.  औरंगाबाद, पुणे, वाशी आदी बाजारपेठांमध्ये विक्री केली. त्यास १०० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत दर मिळाला.  -कृष्णा फलके-९५४५४४१५०४   (तळेगाव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) करटोली विषयी महत्त्वाचे 

  • मोमारडिका डायओयिका असे शास्त्रीय नाव. ‘वाइल्ड करेला फ्रूट’ असेही संबोधन. 
  • वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातेत काही प्रमाणात लागवड.
  • वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढतात. वेलींना जमिनीत कंद असतात.
  • भोपळ्याच्या कुळातील वनस्पती. जून ते ऑगस्टमध्ये फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
  • डोकेदुखी, मुतखडा, विषबाधा, हत्तीरोग, आतड्यांच्या तक्रारी, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्‍वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यावर गुणकारी 
  • करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असते. पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात पाहण्यास मिळते. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर भाजी हितावह असते. 
  • - डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज् कुलकर्णींची धडपड मोठी औरंगाबादला वास्तव्य असलेल्या मिलींद कुलकर्णी यांची कन्नड तालुक्यातील चांभारवाडी शिवारात बारा एकर शेती आहे. पैकी सात एकर कोरडवाहू व पाच एकर शेततळ्याच्या आधाराने चार वर्षांपूर्वी बागायती केली. दहा गुंठे पॉलीहाऊस, २० गुंठे आंबा, तीन एकर डाळिंब, प्रायोगिक तत्त्वावर जिरेनियम, ८ गुंठे करटोले असं नियोजन त्यांनी केलं आहे. अन्य राज्यातील करटोली शेती, त्याचे वाण यांची इत्थंभूत माहिती त्यांनी घेतली. अखेर बंगळूर भागात असलेल्या ‘आयसीएआर’ अंतर्गत केंद्रीय फळबाग संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ लक्ष्मीकांतन भारती यांच्याशी संपर्क साधण्यात यश मिळविले. त्यांनी विकसित केलेल्या ''अर्का भारत'' वाणाचे पाच किलो कंद लागवडीसाठी आणले. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कंदाचे बारीक तुकडे करून त्यापासून रोपे तयार केली. आठ गुंठ्यात दीड बाय दीड मीटरवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात फुले व पुढे फळे लागणे सुरू झाले. ॲग्रोवनच्या प्रेरणेतून करटोलीची शेती  मुळे यांनी यापूर्वी काही पिकांचे प्रयोग केले खरे. पण पर्यायी पिकाच्या शोधात असताना त्यांच्या वाचनात ॲग्रोवन मधील करटोली विषयाचा लेख आला. हेच ते पीक म्हणत त्यांनी बियाण्यासाठी थेट गुजरातमधील आणंद गाठले. तेथून तीन हजार रुपये प्रती किलो दराने बियाणे आणून तीस गुंठ्यात जूनच्या सुरुवातीला लागवड केली. २० ऑगस्टच्या दरम्यान पहिला तोडा झाला. सहा क्विंटल उत्पादन मिळाले. त्यास प्रती किलो १०० रुपये दर मिळून जवळपास ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले. सोबतच पाच किलो बियाणे प्रती किलो तीनहजार रुपये दराने विकून त्यातूनही १५ हजार रुपयांची अतिरिक्त कमाई केली.  सन २०१९ मध्येही ३० गुंठ्यांत साडे ९ क्विंटल उत्पादन मिळाले.जवळच्याच चिंचोली लिंबाजीच्या बाजारात १०० रुपये प्रती किलो दर मिळाला.  यंदाच्या वर्षीचाही अनुभव १२ क्विंटल उत्पादन देऊन गेला.   असा आहे अनुभव कुलकर्णी सांगतात की तज्ज्ञांच्या माहितीनुसार करटोले पिकात नैसर्गिकरित्या परागीभवन १५ ते २० टक्के होऊ शकते. व्यावसायिक उत्पादन घ्यावयाचे असल्याने मजुरांच्या साह्याने नर व मादी फुलांचे परागीकरण केले. परिणामी अपेक्षित फळे मिळणे सुरू झाले. नैसर्गिक हिरवा पोपटी रंग असलेल्या या अर्का भारत वाणाच्या करटोल्याचे दिवसाआड ३० ते ४० किलो उत्पादन मिळते आहे. अति पावसामुळे मध्यंतरी शेतात पाणी साचल्याने उत्पादनाचा वेग मंदावला. त्यातून मार्ग काढताना ठिबक व फवारणीद्वारे  मॅग्नेशियम  दिले. औरंगाबाद शहरातील दशमेश नगरमध्ये असलेल्या शॉपमधून कुलकर्णी थेट ग्राहकांना विक्री करतात. त्यांना किलोला शंभर रुपये व काहीवेळा २०० रुपयांपर्यंतच दर मिळाला आहे.  -मिलिंद कुलकर्णी- ८९९९९०५१३९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com