agriculture news in marathi success story of contract farming of young farmer from konkan district sindhudurg | Agrowon

युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार शेती

एकनाथ पवार
गुरुवार, 23 जुलै 2020

शाश्‍वत उत्पन्न म्हणून १४ एकरांत ऊस तर बाजारपेठेची गरज ओळखून तेवढेच पिकवताना ताज्या उत्पन्नासाठी आठ एकरांत टप्प्याटप्प्याने भाजीपाला व कलिंगड असे नियोजन करून उत्पादन व उत्पन्नाचा सुरेख मेळ साधत आर्थिक घडी स्थिरसावर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील दीपक कासोटे हा तरुण शेतकरी कोकणातील वीस एकर शेती करारावर कसतो आहे. शाश्‍वत उत्पन्न म्हणून १४ एकरांत ऊस तर बाजारपेठेची गरज ओळखून तेवढेच पिकवताना ताज्या उत्पन्नासाठी आठ एकरांत टप्प्याटप्प्याने भाजीपाला व कलिंगड असे नियोजन करून उत्पादन व उत्पन्नाचा सुरेख मेळ साधत आर्थिक घडी स्थिरसावर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडमठ (ता. वैभववाडी) हे कोकण रेल्वेमार्गावरील छोटेसे गाव आहे. कुर्ली-घोणसरी धरण प्रकल्पानंतर गावातील शेतीचे स्वरूप बदलले. तत्पूर्वी भात, नाचणी अशी पिके घेतली जायची. होती. गावात दीपक कासोटे आणि कुटुंबीयांनी टप्प्याटप्याने २० एकर जमीन करारावर घेतली. कासोटे यांचे मूळ गाव कोल्हापूर (कसबा बावडा) असून तेथे त्यांची थोडीफार जमीन आहे. परंतु मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी करार शेतीचा मार्ग निवडला.

प्रयत्नशीलवृत्तीचा युवा शेतकरी

 • बीएस्सी ॲग्री व एमबीए अशा पदव्या घेतलेल्या दीपक यांनी पुणे येथे दोन वर्षे व्यतीत केली. नोकरीच्या मागे न लागता शेतीत काम करायचा निश्‍चय केला. कोल्हापूर येथे त्यांचा नर्सरीचा व्यवसाय होता. त्या माध्यमातून कोकणापर्यंत संपर्क तयार झाला. त्यातून करारावर जमीन उपलब्ध झाली.
 • सुरुवातीला आठ एकर जमीन मिळाली. साधारण २०१३ चा हा कालावधी होता. केळी लागवडीचा निर्णय घेतला. पाच हजार फूट पाइपलाइन घेत पाण्याची सुविधा तयार केली. आंतरपीक म्हणून कलिंगड घेतले.
 • कोकणातील हवामान, पाऊस, वारा, तापमान खूपच वेगळे होते. व्यवस्थापनावर पूर्ण लक्ष केंद्रित करून केळीचे एकूण दोनशे टन उत्पादन घेतले. कलिंगडाचेही चांगले उत्पादन मिळाले.

आर्थिक संकट कोसळले
एक वर्षानंतर आणखी सात एकर जमीन घेतली. त्यातही केळी लागवड केली. दोन्ही बागांमध्ये नियोजनबद्ध काम सुरू होते. स्थानिक हवामान, जमिनीचा पोत आदी बाबींचा बऱ्यापैकी अंदाज येत होता. शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केला. आठ एकरांतील बाग ऑक्टोबर तोडणीला आली. व्यापारी केळी नेण्यासाठी येणार होता त्याच दिवशी सकाळी बागेला चक्रीवादळाचा तडाखा बसला. संपूर्ण बाग क्षणार्धात जमीनदोस्त झाली. सव्वा दोनशे टन मालापैकी फक्त आठ ते दहाच टन माल हाती लागल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले.

संकटावर संकट
दुसरे संकट वाट पाहत होते. अन्य सात एकर बागेतील केळीना चांगले घड आले. झालेले नुकसान भरून काढता येईल अशी अपेक्षा होती. परंतु २०१५ मध्ये केळीचे दर अचानक घसरले. सन २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. या कालावधीत केळीला प्रति किलोचा दर २ ते अडीच रुपये होता. याच दराने साडेतीनशे टन माल विकला तर ५० टन माल बागेतच वाया गेला. त्यानंतर मात्र पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरविले.

बदललेली पीक पध्दती

 • दीपक यांनी यानंतर पुढील बाबींवर लक्ष केंद्रित केले.
 • केळीचे पीक बंद केले.
 • शाश्‍वत उत्पादन व उत्पन्न देणारा ऊस घ्यायचा. विक्रीची जोखीम नाही.
 • नगदी व ताजे उत्पन्न देणारा भाजीपाला वर्षभर घ्यायचा.
 • दोन हंगामात टप्प्याटप्प्याने कलिंगड घ्यायचे.
 • व्यापाऱ्यांना मागणी विचारायची, त्यानुसार हंगाम व क्षेत्र निश्‍चित करायचे. तेवढेच पिकवायचे. जेणे करून विकले जाईल.
 • व्यापाऱ्यांशी बोलून प्रत्येक हंगामात दर निश्‍चित करून घ्यायचा, म्हणजे दरांच्या चढउताराची जोखीम नाही.

ऊसशेती

 • २० एकर करार शेतीपैकी १४ एकर क्षेत्र उसासाठी राखीव
 • त्यात आंतरपीक म्हणून कलिंगड घेतले. मात्र पूर्ण ऊसच.
 • कोकणातील हवामान व जमीन यांचा विचार करता एकरी ४० टन किंवा एकूण ५०० टन ऊस हाती लागेल असे उद्दिष्ट.
 • या पिकाचे उत्पन्न म्हणजे ‘फिक्स डिपॉझीट’प्रमाणे असल्याचे दीपक सांगतात.

आठ एकरांत भाजीपाला

 • स्थानिक बाजारपेठेची मागणी ओळखून आठ एकरांत वर्षभर भाजीपाला
 • यात भेंडी, कारली, वाल, घेवडा, काकडी आदी विविध प्रकार. यंदा मेमधील लागवडीतून उत्पादन सुरू झाले आहे. दररोज २०० किलो भेंडी, १०० किलो कारली, १५० किलो वाल मिळते.
 • व्यापाऱ्याकडून भाजीपाला निहाय किलोला २५ ते ४० रुपये अशी दरांची ‘रेंज’ निश्‍चित केली जाते.
 • मालवण, कसाल, कट्टा, कुडाळ या भागात मागणी
 • पाच एकरांत शेवगा. त्यात आंतरपीक म्हणून भेंडी, कारली, दोडका, वाल, वांगी नियोजन

कलिंगडासाठी राखीव क्षेत्र

 • दरवर्षी जानेवारी व एप्रिल-मे या कालावधीत हंगामात कलिंगड येईल असे नियोजन
 • व्यापाऱ्यांशी बोलून मागणी ओळखून टप्प्याटप्प्याने दीड ते तीन एकर क्षेत्र त्यासाठी राखीव

लॉकडाऊनमध्ये थेट विक्री
यंदा आठ एकरांत लागवड होती. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीस सुरुवात झाली. गोव्यातील व्यापाऱ्याने २० टन माल खरेदी केला. प्रतिकिलो दहा रुपये दर मिळाला. परंतु दुसरी गाडी येण्यापूर्वीच सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. मोठा पेच निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात माल बागेत तयार झाला होता. सुरुवातीचे आठ दिवस तर विक्रीविषयी कोणतीच स्पष्ट नसल्यामुळे तब्बल ४० टन माल बागेत वाया गेला. नंतर माल विक्रीस परवानगी मिळाली. परंतु ज्या व्यापाऱ्याने संपूर्ण खरेदीची हमी घेतली होती तो गोव्यातच अडकला. अखेर दीपक यांनी दोन कामगारांना सोबत घेऊन स्थानिक गावांमध्ये टेंपो घेऊन जाऊन थेट विक्री सुरू केली. ५० टन मालाचा खप झाला. पुढे व्यापाऱ्यांनीही माल घेतला. एकूण सुमारे १७० टन विक्री झाली. सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळाला.

संपर्क- दीपक कृष्णा कासोटे, ९९६०१६७२७२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...