Agriculture news in marathi success story of dairy business from pune district | Agrowon

दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराट

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 28 जुलै 2020

शेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील गाडेकर कुटुंबाने सुमारे २२ वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्धव्यवसाय सुरू केला. चिकाटीने सुमारे ५५ गायींपर्यंत विस्तार केला आहे.

शेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील गाडेकर कुटुंबाने सुमारे २२ वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्धव्यवसाय सुरू केला. चिकाटीने सुमारे ५५ गायींपर्यंत विस्तार केला आहे. दूध विक्री, शेणखत आदींच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल तीस लाखांच्या पुढे नेली. व्यवसायाच्या जोरावर घरबांधकाम, वाहने, जमीन खरेदी, शेतीत सुधारणा, मुलांचे शिक्षण आदी प्रगती साधली. आपल्या सातत्यपूर्ण कामातून कुटुंबाने पंचक्रोशीत नाव मिळवले आहे.

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसायाला प्राधान्य देतात. शेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर) येथील गाडेकर कुटुंबाचा व्यवसायही असाच चिकाटीतून भरभराटीस आला आहे. भाऊसाहेब, दत्तात्रय व अनिल या गाडेकर बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. अनिल दुग्ध व्यवसाय तर अन्य बंधू शेती व पोकलॅनचा व्यवसाय सांभाळतात.

दुग्धव्यवसायातील वाटचाल
गाडेकर कुटुंबाची २५ एकर शेती आहे. बहुतांश सर्व क्षेत्र डाळिंबाचेच आहे. कुटुंबाने १९९२ पासून एका गायीपासून दुग्धव्यवसायास सुरुवात केली. गायींच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ केली. दहा वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्च करून दोन गोठ्यांची (शेड) उभारणी केली. गायींची संख्या वाढत असल्याने यंदा पुन्हा तीन लाख रुपये खर्च करून नवे शेड उभारले आहे.

सध्याचा दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात

 • व्यवसाय सुरू केला तेव्हा सुरुवातीला पंचवीस लीटर दूध उत्पादन व्हायचे. त्यात वाढ करून तीनशे लीटरपर्यंत नेण्याचा अनिल यांचा मानस होता.
 • आज लहान मोठी संकरित जनावरे धरून संख्या ५५ पर्यंत आहे.
 • वर्षभराचा विचार करता प्रति दिन दूध संकलन सुमारे ४५० ते कमाल ६०० लीटर
 • दूध संघ तसेच खवा व्यावसायिकांना पुरवठा.
 • आपल्या शेतीत पूर्णपणे डाळिंब असल्याने चाऱ्यासाठी पाच एकर शेती करारावर. त्यात मका, ऊस, गवतवर्गीय वाणाची लागवड
 • दरवर्षी एका एकराला करारानुसार पंचवीस हजार रुपये मोबदला देतात.
 • गोठा व्यवस्थापनात चार परप्रांतीय तरुणांची नियुक्ती केली होती. लॉकडाऊनच्या काळात दोन मजूर गावी गेले असून सध्या दोन मजूर कार्यरत आहेत. शिवाय घरची तरुण पिढी या व्यवसायात राबते.

शेणखताचा वापर
डाळिंब बागेत शेण व गोमूत्राच्या स्लरीचा उपयोग होतो. दर वर्षाला सुमारे पाच टन गांडूळखत तयार करण्यात येते. दरवर्षी सुमारे ७० ते अलीकडे शंभर ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील पन्नास ट्रॉली शेणखताचा वापर आपल्या शेतीत होतो. उर्वरित वाळलेल्या खताची विक्री प्रति ट्रॉली पाच हजार रुपये तर ओल्या खताची विक्री अडीच हजार रुपये दराने मागणीनुसार होते. शेतकरी घरी येऊन खरेदी करतात. दरवर्षी दीड लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न खतविक्रीतून होते. डाळिंबाला सेंद्रिय घटकांचा वापर केल्याने उत्पादन व गुणवत्तेतही वाढ झाली आहे.

व्यवसायातून झालेली प्रगती
डाळिंबाची शेती आणि त्याला उत्तम व्यवस्थापनातून दुग्धव्यवसायाची दिलेली जोड यामुळे कुटुंबाला आर्थिक भरभराट करता आली आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे चार एकर जमीन काही लाख रुपयांना विकावी लागली होती. एकवीस लाख रुपये देऊन ती परत घेणे शक्य झाले आहे. शेतातून चारा आणण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी चार ट्रॅक्टर्स, एक पीक अप, एक जीप, मित्राच्या भागीदारीत पोकलेन यंत्र घेता आले. याशिवाय सुंदर बंगला बांधता आला. मुलांना चांगले शिक्षण देता येत आहे. अनिल यांचा एक मुलगा बीएस्सी ॲग्री तर दुसरा बी. टेक. ॲग्री करतो आहे.

लॉकडाऊनचा फटका
कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यावसायिकांना सोसावा लागला. सहाशे लीटरपैकी दोनशे लीटर दूध खवा व्यावसायिकांना ३५ रुपये प्रति लीटर दराने दिले जात होते. मात्र लॉकडाऊन काळात खव्याला मागणी नव्हती. आता पुन्हा खव्यासाठी विक्री होत असली तरी चार महिन्यांमध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. संघासाठीही दुधाचे दर कमी आल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

गाडेकर यांच्याकडून शिकण्यासारखे

 • अत्यंत कमी खर्चात दुग्ध व्यवसाय सुरू करून तो चिकाटीने सुरू ठेवून त्यात भरभराट आणली.
 • अडचणीच्या काळातही हार मानली नाही. त्यामुळे व्यवसाय टिकून राहिला.
 • सुरुवातीला अन्य संकलन केंद्राला दूध पुरवीत. आता स्वतःचेच संकलन केंद्र सुरू करून त्याअंतर्गत तालुका संघाला दूध पुरवठा होतो.
 • या व्यवसायाच्या जोरावरच शेतीचा विकास केला. उपलब्ध शेणखताच्या वापरातून जमीन सुपीक केली.
 • मजूरबळ कमी करण्यासाठी दूध काढणीसाठी यंत्राचा वापर
 • अनिल यांचा जिल्हा परिषदेतर्फे आदर्श गोपालक पुरस्काराने गौरव झाला आहे.

प्रतिक्रिया
कोणत्याही व्यवसायात सातत्य व चिकाटी महत्त्वाची आहे. अनेक अडचणींवर मात करत आम्ही अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय जोपासला व वाढवला. त्यामुळे प्रगती करू शकलो.
अनिल गाडेकर, ७९७२०८४९७८, ९८६०१५३२७९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...