Agriculture news in marathi success story of farmer from dabhadi village district nashik | Agrowon

संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलता

मुकुंद पिंगळे
गुरुवार, 9 जुलै 2020

दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांनी प्रतिकूल हवामान, अवर्षण यांच्याशी लढा देत अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येतून प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. 

दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांनी प्रतिकूल हवामान, अवर्षण यांच्याशी लढा देत अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येतून प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. निर्यातक्षम व अर्ली द्राक्ष उत्पादनात कौशल्य मिळवण्याबरोबर फळपिके, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे प्रयोग त्यांनी केले. बाजारपेठेचा अभ्यास करून कुटुंबाच्या ताकदीने बहुपीकपद्धतीतून आर्थिक स्थैर्यता मिळविली आहे.

दाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम यांच २५ एकर शेती आहे. सन १९८९ मध्ये अभियांत्रिकी पदविकेला त्यांनी प्रवेश घेतला. मात्र काही कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिले. पूर्वी बाजरी, मका, कांदा ही पिके होती. सन १९९१-९२ दरम्यान गणेश डाळिंबे, कालानुरूप बदल करत पुढे २० एकरांत आरक्ता, भगवा डाळिंबाची लागवड केली. पुढे तेलकट डाग रोगामुळे बागा काढाव्या लागल्या. दरम्यान अवर्षणग्रस्त भाग असल्याने पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी टॅंकर घेतले. ट्रक वाहतूक व्यवसाय केला.

संघर्षातून विस्तारली द्राक्षशेती
प्रतिकूल हवामान, दुष्काळ यातून संघर्ष सुरू होताच. तेलकट डाग रोगामुळे डाळिंबाचे नुकसान झाले होते.मात्र हिंम्मत न हारता धनराज यांनी प्रयोगशीलता टिकवली होती. लग्न झाल्यानंतर ज्यांच्यासोबत सोयरीक झाली त्यांची द्राक्षशेती होती. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. त्यातून २००८ मध्ये दोन एकरांवर द्राक्ष लागवड केली. अभ्यासवृत्ती व अनुभवाने शिकत टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र १५ एकरांवर नेले. विविध संकटांनी परीक्षा पाहिली. कधी फयान, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी यामुळे हाताशी आलेला घास वाया गेला. मात्र न डगमगता त्याच उमेदीने ते पुन्हा उभारले. विविध प्रयोगांमधून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले.

द्राक्षशेती

 • आगाप निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन
 • क्षेत्र (एकर)- नानासाहेब पर्पल ३, क्लोन टू- ३, शरद सीडलेस १.५, थॉम्पसन ४, सोनाका (यंदा) २.५ एकर.
 • उत्पादन एकरी- ११ ते १३ टन
 • निर्यात: ७० ते ८० टक्के (दुबई,रशिया, थायलंड, युरोप)
 • दर- ब्लॅक वाण- किलोला ९० ते १५० रुपये. व्हाईट- ७५ ते १२० रुपये.

सिंचनस्त्रोत केले बळकट
जमीन मध्यम हलक्या स्वरूपाची. त्यामुळे पिके लवकर वाफसा स्थितीवर येतात. त्यात पाण्याचा प्रश्न बिकट होता. बागायती क्षेत्राला संरक्षित सिंचन होण्यासाठी २००२ मध्ये सुमारे सव्वा एकरांत एक कोटी २५ लाख लीटर क्षमतेचे शेततळे उभारले. साडेसहा हजार फूट अंतरावरून जलवाहिनी आणली. ठिबक सिंचनही केले.

समस्येवर शोधला मार्ग
मागीलवर्षी अतिवृष्टीत संपूर्ण १५ एकरांवरील हाताशी आलेली द्राक्षे मातीमोल झाली. केलेली मेहनत अन ३५ लाखांचा खर्च वाया गेला. सुमारे ७० लाखांपर्यंत अपेक्षित उत्पन्न डोळ्यासमोर संपुष्टात आले. शिल्लक द्राक्षे वाईन प्रक्रियेसाठी दिली. त्याचे अवघे नऊहजार रुपये हाती आले. अशा परिस्थितीतही हताश न होता धनराज जिद्दीने उभे राहिले. पुढील तीन-चार महिन्यांच्या काळासाठी याच द्राक्षमांडवाचा वापर करून बागेत विविध भाजीपाला घ्यायचा. त्यातून उत्पन्न मिळवायचे व नंतर द्राक्ष छाटणीकडे वळायचे असे ठरले.

 • त्यातून घेतलेली पिके- टोमॅटो, कारले, ढोबळी मिरची, काकडी
 • प्रत्येक पिकाचे एकरी उत्पादन- सुमारे ८ ते १० टन वा त्यापुढे
 • द्राक्षाला दिलेली खते या पिकांना उपयोगी पडल्याने काही पिकांचे एकरी १५ टनांपुढेही उत्पादन.
 • मालेगाव, सटाणा बाजारपेठांत मागणी नसल्याने दर कमी होते. मग शेजारील गुजरात व मध्यप्रदेशातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून पुरवठा केला. गुणवत्ता, रंग व आकारामुळे पसंती मिळत गेली. स्थानिक बाजाराच्या तुलनेत अधिकचा दर मिळाला.

शेतीतील महत्त्वपूर्ण बाबी

 • प्रयोगशीलता, नावीन्यात व व्यवहार्यता या तीन बाबींना ठेवले केंद्रस्थानी
 • सर्व कुटुंब एकत्रित राबते. धनराज शेती, मजूर व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार, पत्नी प्रमोदिनी महिला मजूर नियोजन, भाजीपाला तोडणी, प्रतवारी नियोजन पाहतात. मुलगा सुदर्शनही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. कृषी पदवीचे शिक्षण घेत असलेला मुलगा अक्षय विविध प्रयोग करतो. वडील यादवराव यांची देखरेख व मार्गदर्शन राहते.
 • कमी खर्चात अधिक उत्पन्नासाठी जैविक निविष्ठांचा वापर
 • राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र, गाझीयाबाद (उत्तरप्रदेश) येथील जिवाणू खतांचे द्रावण अक्षय याने मध्य प्रदेशातून उपलब्ध केले. त्यासह जीवामृत निर्मितीसाठी आठ टाक्या तयार केल्या आहेत.
 • दर्जेदार व भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड
 • पीकनिहाय वेळापत्रक निश्चित करून कामकाज व अचूक नोंदी
 • कमी मनुष्यबळात यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कार्यक्षमता ग्रेडिंग, पॅकिंग करून विक्री
 • खर्चात बचत करण्यासाठी रासायनिक खते व कीडनाशकांचा गरजेएवढाच वापर
 • शेतीला पशुपालनाची जोड
 • कृषी संशोधन केंद्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी देऊन कालानुरूप बदल
 • २००२ मध्ये उभारलेले मालेगाव तालुक्यात कदम यांचे पहिले शेततळे असावे.
 • गेल्या पंधरा वर्षांच्या काळात या भागात फारसे प्रयोग न झालेल्या केळी, हळद, आले यांचे प्रयोग व चांगले उत्पादन. खरबूज, टरबूज, इनलाईन ठिबकवर कांदा, मका, बाजरी

आईच्या स्मृतीची वास्तू
निकम कुटुंब मळ्यातच राहते. आपल्या टुमदार बंगल्याला धनराज यांनी आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिच्या साखरबाई नावावरून ‘साखर’ नाव दिले आहे

शेतीतून वैभव

 • पूर्वीच्या १२ एकरांत १३ एकरांची भर घालत २५ एकरांपर्यंत शेतीचा विस्तार
 • अद्ययावत यांत्रिकीकरण
 • मजुरांसाठी निवासव्यवस्थेसह कौटुंबिक, आरोग्य व आवश्यक सुविधा
 • मजुरांची ने-आण व शेतमाल वाहतुकीसाठी स्वतःची वाहन व्यवस्था

संपर्क- धनराज निकम: ८३२९२७९५१२
अक्षय निकम:८४११९७०८५७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...