,,,यांनी एका शेळीपासून केली होती शेळीपालनाला सुरुवात !

,,,यांनी एका शेळीपासून केली होती शेळीपालनाला सुरुवात !
,,,यांनी एका शेळीपासून केली होती शेळीपालनाला सुरुवात !

 शेतकरी ः रवी राजपूत पाल, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

पाल (जि. औरंगाबाद) येथील रवी राजपूत यांनी १ शेळीपासून शेळीपालनाला सुरुवात केली. त्यांच्या शेळीपालनाचा आता  २५ शेळ्या, तीन बोकड आणि २७ करडांमध्ये विस्तार झाला आहे.   एका शेळीपासून सुरवात करणाऱ्या रवी राजपूत यांच्याकडे आता २५ शेळ्यांचा फार्म तयार झाला. सहा- सात वर्षांच्या सातत्यपूर्ण नियोजनाचा हा परिपाक आहे. सुरवातीला शास्त्रीय माहितीसाठी ॲग्रोवनवर अवलंबून असलेल्या रवी राजपूत यांची दखल ॲग्रोवनने घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या फार्मचे नाव ‘ॲग्रोवन गोट फार्म’ असे ठेवले आहे.  रवी राजपूत यांनी शेळीपालन व्यवसायाला २०११ मध्ये एका शेळीसह सुरवात केली. हळूहळू शेळ्यांच्या संख्येत वाढ करत गेले. वाढीच्या टप्प्यानूसार शेळ्यांचे आरोग्य, आजार याबरोबरच खाद्य व्यवस्थापनावर प्राधान्याने लक्ष दिले. शास्त्रीय पद्धती आणि नव्या साधनांची जोड दिली. आज त्यांच्याकडे २५ शेळ्या, २७ करडे आणि तीन बोकड आहेत. वाढ करण्याची संधी असली तरी चाऱ्याचा विचार करता त्यांनी आपला गोट फार्म २५ ते ३० उत्पादनक्षम शेळ्यांपुढे जाणार नाही, यावर कटाक्ष ठेवला आहे. त्यांच्या फार्ममध्ये सिरोही, सोजत, कोटा, बीटल, आफ्रीकन बोअर, उस्मानाबादी आदी प्रकारच्या शेळ्या आहेत. पुनरुत्पादनासाठी कोटा, सोजत, आफ्रीकन बोअर जातीचे बोकडही सांभाळले आहेत. दरवर्षी साधारणत: ५० नगांची विक्री ते करतात. त्यामधून दरांच्या चढ उताराप्रमाणे अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळते. अत्यल्पभूधारक शेती असलेल्या राजपूत यांचा आता शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय बनला आहे.  शेळ्यांचे व्यवस्थापन

  • शेळी हा काटक प्राणी असला तरी शेळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 
  • राजपूत दररोज नित्यनेमाने प्रत्येक शेळीची स्वत: तपासणी करतात. 
  • नियोजित वेळी लसीकरण केले जाते. 
  • आवश्यक तेव्हा पशुवैद्यकाचा सल्ला घेतात. 
  • प्रत्येक शेळीला सकाळी सात वाजता गहू, मका, डाळचुरी मिक्‍स किमान अडीचशे ग्रॅम या प्रमाणात खायला दिले जाते. 
  • सकाळी दहा ते बारा या वेळेत शेळ्यांना चरण्यासाठी नेले जाते. त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान सोयाबीन, तूर आदी भुसाचा कोरडा चारा शेळ्यांना देतात. ऊन कमी झाल्यानंतर चार वाजल्यानंतर शेळ्या जवळपास दोन तास चरण्यासाठी सोडतात.  
  • उन्हाळ्यात शेळ्यांना कमीत कमी ऊन लागेल याची काळजी घेतात.  
  • प्यायला स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाते. उन्हाळ्यामध्ये पाणी थंड व ग्लुकोज मिसळून देणे अधिक फायदेशीर ठरते. 
  • गाभण शेळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. 
  • प्रत्येक शेळीला पोटभर चारा उपलब्ध होईल याकडे लक्ष ठेवले जाते. 
  • रोजच्या नियोजन काटेकोर ठेवले जाते.  
  • सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास शेळ्यांना रानात चरण्यासाठी नेले जाते. 
  •   उन्हाळ्यात गाभण शेळ्याना हिरवा लसूण घास जास्त प्रमाणात देऊ नये, यामुळे शेळी गाभडनण्याचे प्रमाण वाढते. 
  •   महिन्यातून एकदा प्रत्येक शेळीला मोहरीचे तेल हळद मिसळून ५० मि.ली. पाजले जाते.  
  •   वर्षातून एकदा सर्व लसी दिल्या जातात.  
  •   वर्षातून चार वेळेस जंतनाशक पाजले जाते.  
  •   शेळ्यांचा दरवर्षी विमा उतरवला जातो.  
  •   शेळ्यांना कोरडा व हिरवा चारा मिसळून दिला जातो.   
  •   शेळ्यांना गहू, मका, सोयाबीन व दाळचूरी याचा भरड्यासह खनिज मिश्रण दिले जाते.  
  •   शेळ्या, बोकड आणि करडे यांना चांगल्या प्रकारचे लिव्हर टॉनिक महिन्यातून सात दिवस पाजले जाते. 
  •   शेळ्यांच्या गोठ्यात चाटण विटा टांगल्याने क्षाराची कमतरता कमी होण्यास मदत झाली आहे.  
  •   शेळ्यांचा गोठा मोकळा हवेशीर रहावा. यासाठी गेठ्याभोवती झाडे लावली आहेत.   
  •   शेळ्यांच्या गोठ्यात चुना व जंतुनाशकाची दर आठ दिवसाला फवारणी केली जाते. 
  •   गोठ्यामध्ये जुळे किंवा तिळे देणाऱ्या शेळ्या ठेवल्या जातात. त्यामुळे गोठ्याची उत्पादनक्षमता वाढते. एकूणच शेळीपालन फायद्याचे होते.  
  •   रवी राजपूत, ९४२३४५३९०८, ९०२१५३४३६१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com