तब्बल २३०० टन ताज्या शेतमालाची विक्री

कोरेगाव कृषी विभागाचा उपक्रम कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका कृषी कार्यालयाने मालाची उपलब्धता, वितरण, वाहतूक व्यवस्था व ग्राहक अशा सर्व स्तरावर विक्री व्यवस्थेचे पद्धतशीर नियोजन केले. त्यातून जिल्हा व जिल्ह्याबाहेर मिळून फळे व भाजीपाला मिळून सुमारे २३०० टन ताज्या शेतमालाची विक्री करण्यात घवघवीत यश मिळवले. त्यातून पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या मालाला हक्काच्या बाजारपेठा मिळण्यास मदत झाली.
सातारा भाागातील शेतकऱ्याेचा शेतमाल
सातारा भाागातील शेतकऱ्याेचा शेतमाल

कोरेगाव कृषी विभागाचा उपक्रम कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका कृषी कार्यालयाने मालाची उपलब्धता, वितरण, वाहतूक व्यवस्था व ग्राहक अशा सर्व स्तरावर विक्री व्यवस्थेचे पद्धतशीर नियोजन केले. त्यातून जिल्हा व जिल्ह्याबाहेर मिळून फळे व भाजीपाला मिळून सुमारे २३०० टन ताज्या शेतमालाची विक्री करण्यात घवघवीत यश मिळवले. त्यातून पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या मालाला हक्काच्या बाजारपेठा मिळण्यास मदत झाली. .

 कोरोना संकट व लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी नेमकी भाजीपाला व फळांची काढणी सुरू होती. साहजिकच विक्री, वाहतुकीच्या समस्या सुरू झाल्या. सातारा जिल्हा भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांचा नाशवंत मालही धोक्यात आला. कोरेगाव तालुका कृषी विभागाने तातडीने यावर उपाय सुरू केले. अन्नधान्य, निविष्ठा, फळे, भाजीला यांची विक्री सुरळीत होण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत झाली. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समन्वय केला. त्यांच्या सहकार्याने तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध उपक्रम हाती घेतला. विक्रीचे असे केले नियोजन शेतकऱ्यांकडील शेतमालाची उपलब्धता, वाहतुकीसाठी असलेली वाहने, त्यांचे परवाने, ग्राहक, त्यांची मागणी अशा सर्व बाबी लक्षात घेऊन या माहितीचे संकलन गुगल शीटद्वारे तयार केले. संबंधित वाहतूकदारांना सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून २०० वाहतूक परवाने प्राप्त झाले. गावोगावी जाऊन त्याचे वाटप झाले. गावपातळीवर कृषी सहायक, शेतकरी व वाहतूकदारांच्या समन्वयातून व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे शेतमाल खरेदी-विक्री व्यवस्थापन केले. या उपक्रमाचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी तालुक्यातील समृद्ध गाव व पाणी फाउंडेशन संकल्पनेतील ४० गावांची मदत घेण्यात आली. संबंधित गावांतील सरपंच व कार्यकर्त्यांचे योगदान आणि तालुक्यातील आत्मा अंतर्गत शेतकरी गटांचा समावेश करून घेतला. उल्लेखनीय विक्री कुमठे, सातारा रोड, रहिमतपूर, वाठार स्टेशन या परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे मागणीनुसार नगरपालिका क्षेत्रात वितरित करण्यात आला. वाई, सातारा, महाड, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पुणे, नवी मुंबई, ठाणे, बोरीवली या शहरी भागांत थेट अपार्टमेंटमध्ये त्यांची विक्री करण्यात आली. या उपक्रमातून लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात ११०० तर जिल्ह्याबाहेर १२०० अशा एकूण २३०० टन शेतमालाची विक्री झाली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. कलिंगड, द्राक्षे यांच्यासह आले, कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॅावर, हिरवी मिरची, वांगी आदी विविध भाजीपाला पॅकिंग करून विक्री होत होता. शेतकरी व ग्राहका अशा दोघांना परवडेल या पद्धतीने व्यवहार झाले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचा धोका टळला. नवा ग्राहक जोडला गेला व शेतकऱ्यांना हक्काच्या बाजारपेठा मिळाल्या. ठळक बाबी -आरोग्य सुरक्षिततेसाठी भाजीपाला घेऊन जाताना तसेच विक्री करून आल्यानंतर वाहनांचे ‘सॅनिटायझिंग’ करण्यात येत होते. - प्रति दिन सुमारे ३५ ते ४० टन माल ग्राहकांपर्यंत पाठविण्यात येत होता. - आठ शेतकरी कंपन्यांसह नोंदणीकृत ३५७ तर अन्य अशा पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. - दुसऱ्या टप्प्यातील लॅाकडाऊनमध्ये पणन विभागाच्या सहकार्याने पुणे, मुंबई येथील अर्पाटमेंटमध्ये थेट विक्री झाली. तळकोकण, महाड या बाजारपेठाही मिळाल्या. प्रतिक्रिया . सर्वांच्या सहकार्याने तालुका कृषी कार्यालयाच्या नियोजनातून राबवण्यात येत असलेला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्याही तो सुरू आहे. भविष्यातही थेट उत्पादक-ग्राहक विक्री व्यवस्थापन (सप्लाय चैन मॅनेजमेंट) ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना यशाची गुरुकिल्ली ठरेल. बापूसाहेब शेळके- तालुका कृषी अधिकारी, कोरेगाव. संपर्क- ९४२३९६४००५ लॅाकडाऊन मध्ये शेतमाल वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती. अशावेळी कृषी विभागाने मोठी मदत केली. आवश्यक ते सर्व परवाने उपलब्ध होण्यासाठी मदत झाली. थेट ग्राहकांना विक्री करता आली. भविष्यात हा कायमस्वरूपी ग्राहक निर्माण होणार आहे.

संपर्क -ळासाहेब देशमुख- ९०११२१०५६४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com