Agriculture news in marathi success story of fruit orchards of farmer from deolgav sakarsha district nashik | Agrowon

प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवन

गोपाल हागे
गुरुवार, 30 जुलै 2020

देऊळगाव साकरशा (जि. बुलडाणा) येथील गणेश गायकवाड यांनी आपल्या १६ एकरांत अत्यंत हलक्या प्रतीच्या, उतारमाथ्याच्या जमिनीवर फळबागांचे नंदनवन फुलविले आहे.

नव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन प्रयोगशील शेती करू लागले आहे ही उत्साहाची बाब आहे. देऊळगाव साकरशा (जि. बुलडाणा) येथील गणेश गायकवाड यांनी आपल्या १६ एकरांत अत्यंत हलक्या प्रतीच्या, उतारमाथ्याच्या जमिनीवर फळबागांचे नंदनवन फुलविले आहे. जोडीला बीजोत्पादन, ऊस रसवंती, आंतरपीक पद्धती या माध्यमातून त्यांनी प्रयत्नवाद, प्रगतीशीलता यांचा प्रत्यय दिला आहे.

देऊळगाव साकरशा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील गणेश गायकवाड यांची वडिलोपार्जित १६ एकर शेती आहे. सोयाबीन, ज्वारी, मूग अशी पिके त्यात घेतली जात. शेती चढ उताराची आणि हलक्या प्रतीची आहे. अर्थकारण मजबूत होत नसल्याने जोडव्यवसाय म्हणून ठिबक जोडणीचे काम त्यांनी सुरू केले. घरच्या शेतातही विहीर खोदली. डिझेलवर चालणारे इंजीन बसवून सिंचन व्यवस्था उभी केली. पण खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती होती. विजेचीही व्यवस्था केली.

शेतीतील प्रयोग
शेती विकासाच्या पहिल्या टप्प्यात तीन एकरांत मका घेतला. वीजपुरवठा सुरू झाला तरी विहिरीला पाणी पुरत नव्हते. सन २००१ पर्यंत संघर्ष सुरू होता. मग कपाशीची लागवड केली. सिंचनासाठी मित्राजवळील ठिबकच्या जुन्या नळ्या आणून दुरुस्त करून वापरल्या. कपाशीने पाच लाख रुपयांचे उत्पन्न दिले. यातून आत्मविश्‍वास वाढला.

पाण्यासाठी सर्व प्रयत्न
पाणी कमी पडत असल्याने शेतापासून काही अंतरावर उतावळी प्रकल्पातून पाइपलाइन करण्याचे ठरविले. दोन लाख रुपये शिल्लक होते. तेवढ्यात काम होणारे नव्हते. मग जानेफळ येथील स्टेट बँकेत प्रस्ताव दिला. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर तीन लाख रुपये कर्ज मिळाले. स्वतःजवळील व कर्जरक्कम एकत्र करीत पाइपलाइन करण्यास सुरुवात केली. काहींनी त्यासाठी वेड्यात काढले. परंतु माघार घेतली नाही. पाइपलाइन केली व पाणीही आणले.

फळबागांवर लक्ष केंद्रित
जमिनीचा प्रकार, बाजारपेठेतील मागणी, व्यावसायिकता आदी विविध बाबी लक्षात घेऊन अखेर गणेश फळबागांकडे वळले. दीड एकरात पपई घेतली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन एकर केळी लागवड केली. पपईच्या जागेवरून विक्रीतून साडेचार लाख रुपये हाती आले. केळीचा अनुभव फारसा समाधानकारक ठरला नाही. ती काढून पुढील टप्प्यात चार एकरांत डाळिंबाची बाग उभी केली. त्यात आंतरपीक म्हणून आले लागवड केली. त्यातून तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. डाळिंबाचीही जबलपूर येथील व्यापाऱ्याला विक्री केली. असे विविध प्रयोग आज गणेश यांनी विविध फळपिकांची बाग उभारली आहे.

फळबाग लागवड दृष्टिक्षेपात
डाळिंब..............४ एकर
आंबा................२ एकर
लिंबू.................दीड एकर
पेरू..................दीड एकर
सीताफळ..........२ एकर

केशर आंब्याची बाग उभी करण्याचे ठरविले तेव्हा काहींनी नकारात्मक सल्ला दिला. आपल्या भागात आंबा येत नसल्याचे प्रत्येकजण त्यांना सांगत होता. तरीही माघार न घेता सघन पद्धतीने १२ बाय ८ फुटावर लागवड केली. रत्नागिरी भागातून कलमे आणली. त्यात मल्चिंगवर भुईमुगाचे पीक घेतले. कोल्हापूरहून टीजी-४८ वाणाचे बियाणे आणले. त्यापासून १४ क्विंटल शेंग झाली. ती सहाहजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली.

आंब्याची घरूनच विक्री
यंदाचा हंगाम चांगला राहिला. सुमारे १८ क्विंटल फळे मिळाली. नैसर्गिक पद्धतीने पिकवून चार किलो बॉक्स पॅकिंग करून थेट विक्री केली. पाचशे रुपये प्रति बॉक्स दर होता. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले.

लिंबातून उत्पन्न
चांदवड (नाशिक) येथून थाई लिंबूची ६०० रोपे आणली. पहिला हंगाम मागील वर्षी घेतला. किलोला ४० रुपये दराने विक्री केली. त्यातून सुमारे दोन लाख रुपये मिळाले.

रसवंतीसाठी उसशेती

 • उन्हाळ्यात या भागात जागोजागी रसवंती दिसून येतात. बाहेरील जिल्ह्यातून ऊस आणला जातो. -स्थानिक व्यावसायिकांची गरज ओळखून गणेश रसवंतीसाठीच्या उसाची लागवड करतात.
 • मागील वर्षी ५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ऊस विक्री. आता स्वतःही रसवंती सुरू केली आहे.

संरक्षित शेतीतील प्रयोग

 • गेल्या दोन वर्षांत मेहकर कृषी विभागाच्या सहकार्याने प्रत्येकी दहा गुंठ्यात दोन शेडनेटस
 • एकात संकरित टोमॅटो बीजोत्पादन घेतले. १५ किलो उत्पादन. संबंधित कंपनीने १६ हजार रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकत घेतले.
 • अन्य शेडनेटमध्ये काकडी. सरासरी २० रुपये प्रति किलो दराने खामगावच्या बाजारात विक्री.
 • यंदा एका शेडमध्ये फेब्रुवारीत मिरची तर दुसऱ्या शेडमध्ये टोमॅटो
 • शेडनेटमधील उत्पन्नातून मजुरी, कीडनाशके व अन्य खर्च कमी होतो.
 • लॉकडाऊनचा फटका लिंबू, ऊस या पिकांना बसला. केवळ शेडनेटमधील मिरची उत्पादनातून रक्कम उभी केली.

कुटुंबांचे सहकार्य

 • आई-वडील, पती-पत्नी, दोन मुले असे कुटुंब.
 • पत्नी अमृता शेतीतील व्यवस्थापन पाहतात. ट्रॅक्टरही चालवितात.
 • मोठा मुलगा शिवम नाशिक येथे बारावी तर कार्तिक दहावीचे शिक्षण घेत आहे.
 • वडिलांना दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजार झाला. त्याचा संपूर्ण खर्च गणेश यांनी शेतीतून उभा केला. आता वडील सावरले आहेत.
 • खामगाव-मेहकर मार्गावर दोन एकर शेती विकत घेत वर्षभरापूर्वी गोल्डन जातीच्या सीताफळ वाणाची लागवड
 • गाय, म्हैस व अन्य मिळून ४५ जनावरे. दुधाबरोबरच शेतीसाठी शेणखत, गोमूत्र मिळते.

संपर्क- गणेश गायकवाड- ९७६३४०३९४३, ७०५९५९६४६४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...