agriculture news in marathi success story of Gaurinandan farmer producer company from nagar district reached turnover of 3 crores rupees from seed production | Agrowon

बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल पोचली ३ कोटींवर

सूर्यकांत नेटके 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २००८ मध्ये स्थापन केलेल्या ‘ओम निलांजन’ शेतकरी गटाचे तीन वर्षापूर्वी गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर केले. बिजोत्पादनातून सुरवातीला केवळ दीड लाख रुपयाची उलाढाल आता तीन कोटी पर्यंत पोचली आहे.  

नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील शेतकऱ्यांनी २००८ मध्ये स्थापन केलेल्या ‘ओम निलांजन’ शेतकरी गटाचे तीन वर्षापूर्वी गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर केले. बिजोत्पादनातून सुरवातीला केवळ दीड लाख रुपयाची उलाढाल आता तीन कोटी पर्यंत पोचली आहे. सभासद शेतकऱ्यांचा फायदा विविध उपक्रमातून होत असून, दरवर्षी उत्तम लाभांश दिला जातो.

नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यासह सर्वत्र हरभरा, तूर, गहू, कांदा ही पिके  मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पेरणीच्या हंगामामध्ये उत्तम दर्जाच्या बियाणांची कमतरता भासते. शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील उच्चशिक्षित नितीन पाटील बानकर, ॲड. सयाराम पाटील बानकर, अनिल सोन्याबापू बानकर, सुखदेव लांडे, ॲड. रामेश्वर कुरकुटे, चंद्रशेखर शेटे पाटील यासह  ५१ शेतकरी एकत्र येत २००८ मध्ये ‘आत्मा’ अंतर्गत ओम निरंजन शेतकरी बचत गटाची स्थापना केली.

पहिल्या वर्षी गटातील नितीन बानकर, चंद्रशेखर शेटे, संजय शेटे या तीन शेतकऱ्यांनी १० एकरावर गहू बिजोत्पादन घेतले. दिडशे क्विंटल गहू बियाणे उत्पादन झाले. त्यातून गटाची दीड लाख रुपयांची उलाढाल झाली. बाजार भावापेक्षा २० टक्के दर अधिक मिळाल्याने एकरी चार हजार रुपये फायदा झाला. दुसऱ्या वर्षी सोनई, शिंगणापूर भागातील ५० शेतकऱ्यांनी गव्हाचे ५०० क्विंटल बिजोत्पादन घेतले. त्यावर्षी ५ लाखाची उलाढाल झाली. त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच हजार रुपये फायदा झाला. यातून शेतकऱ्यांचा उत्साह वाढत गेला. तीन वर्षापूर्वी या शेतकरी गटाचे  रूपांतर गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करण्यात आले. आता कंपनीचे नितीन बानकर हे अध्यक्ष आहेत. 

उलाढाल पोचलीवर कोटीवर

 • गेल्यावर्षी सभासद शेतकऱ्यांनी ३०० ते ३२५ एकरवर विविध पीक वाणाचे सुमारे १८०० क्विंटल बिजोत्पादन घेतले. याशिवाय कांद्याचे तीन टन बिजोत्पादन घेतले. 
 •  हे बियाणे कंपनीतर्फे सरासरी बाजारदरापेक्षा वीस टक्के अधिक दर देत खरेदी केले जाते. यातून मागील वर्षी ६५ लाख रुपये उलाढाल झाली. 
 • या वर्षी बिजोत्पादनातून यंदा खरिपात कंपनीची सुमारे दीड कोटीची उलाढाल झाली. उद्दिष्ट ३ कोटी रुपयांचे आहे. 
 • दोन वर्षापासून कंपनीची उलाढाल कोटीपेक्षा अधिक झाली. दरवर्षी साधारण दहा हजाराचा आयकरही भरतात.

बिजोत्पादन व कंसात २०१९-२० मधील उलाढाल  

 • गहू : ६०० क्विंटल (२० लाख रु.) 
 • हरभरा : ३५० क्विंटल 
 • (२८ लाख रु.) 
 • सोयाबीन :  ६५० क्विंटल
 • (५२ लाख रु. ) 
 • तूर : २०० क्विंटल (४० लाख रु.) 
 • कांदा : २ टन (७० लाख रु.) 

पाच जिल्ह्यात बियाणे विक्री
शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने बिजोत्पादनाचे प्रमाण वाढले. त्यातून बियाणांच्या विक्रीसाठी अधिक प्रयत्न करावे लागले. म्हणून गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीमधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाणांच्या विक्रीसाठी नगर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत विक्री व्यवस्था उभारली आहे. त्यासाठी ६ वितरक आणि १ विक्री प्रतिनिधी नियुक्त केला आहे. 

 • कंपनीच्या कामासाठी एक वितरण अधिकारी, एक उत्पादन अधिकारी व चार कर्मचारी नियुक्त केले आहेत.
 • बियाणे पॅकिंग व अन्य कामांसाठी कायमस्वरूपी ७ ते १० मजुर काम करतात. त्यांना प्रति दिन दोनशे ते तीनशे रुपये मजुरी दिली जाते. 
 • नुकतेच कंपनीने सुमारे ११ लाख रुपये किमतीचे प्रतवारी यंत्र खरेदी केले आहे. 

बियाणे खरेदीतही आर्थिक बचत 
नगरसह राज्यातील बहुतांश भागात गावरान कांदा बियाणांचा तुटवडा आहे. गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीतील ६ शेतकऱ्यांनी बारा एकर क्षेत्रामध्ये २ टन कांदा बियाणे उत्पादित केले. बियाणाची तीन ते साडेतीन हजार रुपये किलोने विक्री केली. या उपलब्ध बियाणांपैकी ३० टक्के (१ हजार किलो) बियाणे कंपनीतील सभासद शेतकऱ्यांसाठी राखून ठेवले जाते. सहभागी शेतकऱ्यांना कांदा बियाणांची उपलब्धता  सहजतेने होते. सभासदांसाठी दरही कमी (२ हजार ५०० रुपये प्रती किलो) आहे. परिणामी कंपनी सभासद १०० शेतकऱ्यांची प्रत्येकी एक हजार या प्रमाणे  बचतही झाली. याशिवाय सोयाबीन, तूर, हरभरा, गहु बियाणे खरेदीसाठीही सभासदांना वीस टक्क्याची सवलत दिली जाते. यातून दरवर्षी कंपनीतील एकूण सभासदांची बियाणे खरेदीतून सुमारे वीस लाख रुपये आर्थिक बचत होते.

गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी 

 • कंपनीअंतर्गत गावांची संख्या: ११
 • गावांची नावे: शनी शिंगणापूर, सोनई, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, लोहगाव, झापवाडी, घोडेगाव, चांगोणी, हिंगोणी, खरवंडी, वडाळा, चांदा, महालक्ष्मी हिवरे, तुकाई शिंगवे, करजगाव, निंभरी, शिरेगाव.
 • शेतकरी सभासद: ९५०. (प्रत्येकी एक हजार रुपये या प्रमाणे ९.५ लाख रु. भागभांडवल.)
 • संचालक: सहा (प्रत्येकी दहा हजार रुपये भाग भांडवल.) 
 • दर टप्प्यावर वाढ करत आता कंपनीचे भागभांडवल ः २५ लाख रुपये. 
 • कंपनीला बिजोत्पादन, बियाणे विक्री, गोदाम साठवण यातून उत्पन्न मिळते. 
 • शेतकऱ्यांचे हे बियाणे ‘महापीक’ हा ब्रॅण्डअंतर्गत विकले जाते.
 • बियाणे विक्री व अन्य उत्पन्नाच्या नफ्यातून सहा ते नऊ टक्के लाभांश वाटप.

धान्य साठवणूकीतही आर्थिक बचत

 • कंपनीने सभासदांचे धान्य, कांदा साठवणुकीसाठी साडेतीनशे मेट्रीक टन क्षमतेची दोन गोदामे उभारली आहेत. तेथे सभासदांना माल साठवणूकीसाठी सवलत दिली जाते. शासनाच्या गोदामामध्ये प्रति माह १६ रुपये प्रति क्विंटल दर असताना सभासदाकडून प्रति माह केवळ ८ रुपये घेतले जातात. सभासदांचा दरमहा प्रती क्विंटल आठ रुपये फायदा होतो. 
 • गेल्या वर्षी कंपनीने नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरु केले. असा खरेदी केलेला १५० टन कांदा शेतकऱ्यांच्या चाळीत साठवला. शेतकऱ्यांना कंपनीने प्रतिकिलो एक रुपया भाडेशुल्क दिले.

बिजोत्पादनासाठी शेतकरी व शेत निवड, माती परिक्षण, बियाणे पुरवठा, खत पुरवठा आदी निकष काटेकोरपणे पाळले जातात. गेल्या बारा वर्षात बिजोत्पादन, कमी खर्चात बियाणे, खतांची उपलब्धता करण्यासोबतच शेतीमालाला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहे. सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, या हेतूने कंपनी काम करत आहे. 
- नितीन बानकर , ७९७२७२५९७३ 
अध्यक्ष, गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी.

यंदा हमी दराने पाच हजार क्विंटल तूर, हरभऱ्याची खरेदी केली. त्यामुळे बाजार समित्या बंद व लॉकडाऊनच्या काळात दर कमी असतानाही हमी दराने खरेदी केल्याने प्रती क्विंटल एक हजार रुपयांचा फायदा झाला. आता बिजोत्पादनासोबत शहरातील लोकांना दर्जेदार धान्यविक्रीतूनही सभासदांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
-ॲड. सयाराम बानकर, ९१३०८४२२०० 
(जेष्ठ संचालक, गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनी.)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...