Quality grapes ready for sale and they also planned to make raisins from the remaining grapes and sell them directly
Quality grapes ready for sale and they also planned to make raisins from the remaining grapes and sell them directly

संकटातही आशेचा उगवला 'किरण'

दर्जेदार, रसाळ द्राक्षांसाठी किलोला ८५ रुपयांचा सौदा पक्का झाला. पण अवकाळी आणि कोरोना या संकटांमुळे व्यापारी दर द्यायला तयार होईनात. अखेर हिंमत एकवटून शेतकऱ्याने नातेवाईक, मित्रांची मदत घेत विविध गावांमधून साडे ११ टनांची विक्री साधली व नुकसान टाळले. पिकण्याबरोबर विकू देखील शकतो हा आत्मविश्‍वास जागृत झाला. प्रयोगशील, प्रयत्नवादी युवा शेतकरी किरण लभडे यांची ही यशकथा.

दर्जेदार, रसाळ द्राक्षांसाठी किलोला ८५ रुपयांचा सौदा पक्का झाला. पण अवकाळी आणि कोरोना या संकटांमुळे व्यापारी दर द्यायला तयार होईनात. अखेर हिंमत एकवटून शेतकऱ्याने नातेवाईक, मित्रांची मदत घेत विविध गावांमधून साडे ११ टनांची विक्री साधली व नुकसान टाळले. पिकण्याबरोबर विकू देखील शकतो हा आत्मविश्‍वास जागृत झाला. प्रयोगशील, प्रयत्नवादी युवा शेतकरी किरण लभडे यांची ही यशकथा. नाशिक जिल्ह्यातील निमगाव मढ (ता.येवला) येथील किरण वसंतराव लभडे यांच्या कुटुंबीयांची आठ एकर शेती आहे. येवला तालुका दुष्काळग्रस्त आहे. मात्र प्रयत्नवादी व प्रयोगशील वृत्तीच्या किरण यांनी प्रतिकूलतेतही शेतीची प्रगती साधली आहे. पूर्वी विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर बाजरी, ज्वारी, कांदा, मका, ऊस ही पिके असायची. किरण यांच्याकडे २००८ च्या सुमारास शेतीची जबाबदारी आली. त्यांनी मेच्या उन्हाळ्यात पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीपासून प्रयोगांना सुरुवात केली. शेजारून पाणी घेत पीक यशस्वी केले. यातून आत्मविश्वास वाढला. पुढे नातेवाइकांच्या सल्ल्याने मर्यादित पाण्यात द्राक्ष लागवड केली. शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन बाग जगविली. पहिल्या उत्पादनात चांगले उपन्न मिळविले. यातून बोध घेतला. शेती थोडी करायची, पण नियोजनपूर्वक. मग सिंचन व्यवस्थापन, बदलती पीक पद्धती यांचा अभ्यास करून ती बागायती करण्यावर भर दिला. सिंचन सुविधांचा विकास पाण्याची प्रचंड टंचाई होती. शक्य ते भांडवल गुंतवून ७ ते ८ बोअरवेल्स घेतले. लाखभर रुपये खर्च केले. काही उपयोग झाला नाही. मग द्राक्षबागेतील उत्पन्नातून घरापासून सहा किलोमीटरवरील विहीर खोदण्यासाठी एक गुंठा जागा घेतली. तेथून जलवाहिनीद्वारे पाणी आणले. शासकीय अर्थसाहाय्य न घेता १८ गुंठ्यात शेततळे उभारले. सूक्ष्म सिंचन व गरजेनुसार प्रवाही सिंचन केले. प्रत्येक थेंबाचा अचूक वापर हा किरण यांच्या व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. द्राक्ष शेतीची वैशिष्ट्ये

  • द्राक्ष बाग घेण्यास सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध. मात्र त्यांना विश्‍वासात घेत नातेवाइकांच्या सल्ल्याने बाग उभी केली. पुढे नियोजनपूर्वक विस्तार.
  • सध्या तीन एकरांपैकी थॉमसन व सोनाका प्रत्येकी ३० गुंठे
  • सुधाकर- ६० गुंठे
  • मजुरांच्या उपलब्धतेनुसार तीन टप्प्यात बागांची छाटणी
  • मृदा, पाणी व पानदेठ परीक्षणाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन
  • आर्द्रता टिकवण्यासाठी पाचट व मक्याचा चारा यांचे जैविक मल्चिंग
  • सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी शेणखत, जीवामृत व द्रवरूप जिवाणू खतांचा वापर
  • रेसिड्यू फ्री द्राक्षनिर्मितीचे उद्दिष्ट.
  • हवामानासंबंधी मोबाईलवर अपडेट्स
  • निर्यातक्षम उत्पादन सुरूवातीला स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री व्हायची. पुढे निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. सन २०१६ पासून युरोप, रशिया, बांगलादेश येथे निर्यात करण्यात किरण यांना यश मिळाले. लॉकडाऊनमध्ये हिंमत दाखवली

  • यंदा पहिल्या टप्प्यात दीड एकरांतील थॉंमसन व सोनाका बाग इलाहाबाद येथील व्यापाऱ्याला प्रति किलो ४२.५० रुपये दराने दिली. दीड एकरांतून १२ टन क्विंटल उत्पादन तर सव्वा चार लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या टप्प्यात सुधाकर वाणाची दीड एकर बाग निर्यातदाराला दिली. त्यास प्रति किलो ८५ रुपयांप्रमाणे दर निश्चित झाला.
  • दरम्यान अवकाळी पाऊस व कोरोना ही संकटे उभी ठाकली. लॉकडाऊनमुळे काढणीसाठी आलेले मजूरही परत गेले. निर्यातदारांनी काम थांबविले. व्यापाऱ्यांनी किलोला केवळ ८ ते १० रुपये दर देऊ केला. किरण अत्यंत हताश झाले. सगळच संपलं असं वाटून गेलं. मग कुटुंबीय व मित्रांनी धीर दिला. किरण हिंम्मत एकवटून उभे राहिले. थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला.
  • असे केले विक्री नियोजन

  • सकाळी ६ ते ८ वेळेत कुटुंबीयांकडून द्राक्षकाढणी
  • दररोज दोन मार्ग निवडले. येवला शहरासह तालुक्यातील नागडे, नगरसूल, अंदरसूल, उंदीरवाडी, चिचोंडी या गावांमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन जाणे. यात मित्र व पेट्रोलपंप व्यावसायिकांकडून मदत.
  • सुधाकर हा वाण अत्यंत रसरशीत, टपोरा असल्याने ग्राहकांकडून चांगली पसंती.
  • दररोज सुमारे एक टन विक्री
  • एकूण विक्री- सुमारे साडे ११ टन.
  • दर- २५ ते ४० रुपये प्रति किलो
  • उत्पन्न- सुमारे ३ लाख
  • आपण केवळ पिकवत नाही तर विकूही शकतो हा आत्मविश्‍वास आला. नफ्याचे प्रमाण अत्यंत घटले. मात्र नुकसान टळले.
  • पूर्वहंगामी टोमॅटो उत्पादनात हातखंडा

  • दरवर्षी २० ते २५ मेच्या दरम्यान दोन एकरांत टोमॅटो
  • एकरी सुमारे २८ टन उत्पादन
  • प्रामुख्याने बांगलादेशला निर्यात. पिंपळगाव बसवंत, येवला, रवंदा (ता.कोपरगाव) व मागणीप्रमाणे जागेवरही थेट विक्री.
  • उत्पन्नाचे आदर्श आर्थिक व्यवस्थापन

  • शेतीत नवे तंत्रज्ञान वापरण्यावर भर
  • बॅंकेकडे नियमित वार्षिक परतफेड
  • शेतीतील उत्पन्नातून टुमदार बंगला, यांत्रिकीकरण, मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचा विमा व पुढील पीक पद्धतीसाठी आर्थिक नियोजन आदर्श
  • यातूनच आपत्कालीन, वैद्यकीय खर्च, गरज पडल्यास शेती खर्चासाठी रकमेचा विनियोग. त्यातूनच कुटुंबाने आर्थिक स्थैर्यता मिळविली.
  • किरण व पत्नी वैशाली यांच्याकडे शेतीचे नियोजन. वडील वसंतराव, आई सगुणाबाई यांची मदत व मार्गदर्शन. नातू बजरंग व धाकटा शाहू यांच्या शिक्षणांकडे त्यांचे विशेष लक्ष.
  • ॲग्रोवन मार्गदर्शक किरण ॲग्रोवनचे दररोजचे वाचक आहेत. त्यातून लेख, तांत्रिक सल्ले, मार्गदर्शन ते घेतात. जुनी कात्रणे संग्रहित केली आहेत. आमच्या प्रगतीत ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगतात. संपर्क- किरण लभडे- ९४२१२२६३६९, ९८२२३७३६३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com