Agriculture news in marathi success story of guava grower farmer from pune district | Agrowon

दुष्काळी भागात फळबाग केंद्रित व्यावसायिक शेती

संदीप नवले
गुरुवार, 11 जून 2020

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावरील काळेवाडी या दुष्काळी गावातील देवराम काळे यांनी पेरू पिकातील तज्ज्ञ शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. सीताफळ, अंजीर व डाळिंबाची जोड देत आपली १२ एकर शेती फळबाग केंद्रित बनवून अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एक एकर पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन घेत बहुविध पिकांद्वारे प्रयोगशीलता, सातत्य, चिकाटी, जोखीम घेण्याची वृत्ती, तंत्रज्ञान आत्मसात करणे आदी गुणांचा वापर करून स्वतःचे वैशिष्ट्य जपले आहे.

पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावरील काळेवाडी या दुष्काळी गावातील देवराम काळे यांनी पेरू पिकातील तज्ज्ञ शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. सीताफळ, अंजीर व डाळिंबाची जोड देत आपली १२ एकर शेती फळबाग केंद्रित बनवून अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एक एकर पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन घेत बहुविध पिकांद्वारे प्रयोगशीलता, सातत्य, चिकाटी, जोखीम घेण्याची वृत्ती, तंत्रज्ञान आत्मसात करणे आदी गुणांचा वापर करून स्वतःचे वैशिष्ट्य जपले आहे.

पुरंदर (जि. पुणे) तालुक्यातील काळेवाडी गावची साधारणपणे बाराशेच्या आसपास लोकसंख्या आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्यावर्षी तर अत्यल्प पाऊस पडला. गावातील प्रयोगशील शेतकरी देवराम काळे यांची ११ एकर फळबाग केंद्रित शेती आहे. न खचता दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमी पाण्यात शेती प्रगत करण्याची इच्छाशक्ती त्यांनी जपली आहे. कृषी सहायक अनिल पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी त्यांना सहकार्य करतात.

कमी पाण्यात पीक नियोजन

  • सुमारे चार एकर पेरू, तीन एकर सीताफळ, दोन एकर डाळिंब, दीड एकर अंजीर अशी फळबाग शेती -पेरू हे हुकमी पीक. वडिलांच्या काळापासून असल्याने त्यात मास्टरी.
  • सध्या पाच वाण आहेत. यात सरदारची १२५, ललित ७०, रत्नदीप १४०, बाटली गुलाबी १०० व व्हीएनआर वाणाची ४०० झाडे.
  • पेरूबागेचे नियोजन करताना बागेचे तीन टप्पे. त्यामुळे पीक व्यवस्थापन व फळे काढणे सोपे जाते.
  • बहार धरण्यासाठी एक डिसेंबर पासून बागेला पाणी बंद केले जाते. मार्चमध्ये छाटणी करून खते भरून चाळणी करून पहिले पाणी दिले जाते.
  • अलीकडील वर्षांपासून लागवड पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केले आहेत. अंजिराची १८ बाय १८ फूट, पेरूमध्ये सरदार व बाटली गुलाबी १५ बाय १५ फूट, ललित व रत्नदीप १४ बाय १४ फूट, व्हीएनआर १० बाय १२ फूट, डाळिंब १० बाय १२ फूट, सीताफळ १४ बाय १४ फूट व १२ बाय १२ फूट अशी लागवड केली आहे. त्यामुळे बागेत हवा खेळती राहून रोग-किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.

शेततळ्याची उभारणी
गावात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती असल्याने फळपिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेस बागा सुकूनही जातात. समस्येतून मार्ग काढण्यासाठी चार शेततळी घेतली आहेत. त्यासाठी एक एकर क्षेत्र गुंतवले आहे. सुमारे ९५ लाख लीटर पाणी साठवण्याची क्षमता तयार केली आहे. दोन विहीर, दोन बोअरवेल्स जोडीला आहेत.

संरक्षित शेतीचा अवलंब

  • संरक्षित शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध केला आहे. गावातील अनेक शेतकरी कार्नेशनची लागवड करतात. काळे यांची देखील प्रत्येकी २० गुंठ्यावर दोन पॉलीहाऊसेस आहेत.
  • लग्नसराईत फुलांच्या प्रति गड्डीचा दर अगदी १५० ते २०० रूपयांवरही जातो. बिगर हंगामात हा दर २० रुपये देखील असतो. हंगामात महिन्याला तीन हजार गड्ड्यांची विक्री होते. डिसेंबर आणि मेमध्ये चांगले दर मिळतात. हंगामात महिन्याला ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. यंदा लॉकडाऊनमध्ये मोठे नुकसान काळे यांना सहन करावे लागले आहे.

उत्पादन व उत्पन्न

  • पेरूची दहा वर्षे वयाची झाडे आहेत. सरदार वाणाच्या प्रति झाडापासून १०० किलोपर्यंत उत्पादन मिळते.
  • व्हीएनआर वाणाचे हेच उत्पादन ३० किलोपर्यंत मिळते. या वाणास मागील वर्षी किलोला ८० ते १२० रुपयांपर्यंत दर होता. अंजिराची सुमारे १३० झाडे आहेत. चार वर्षे वयाच्या प्रति झाडापासून ८० किलोपर्यंत उत्पादन मिळते. त्यास किलोला ३० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळतो.
  • सीताफळाचे ३० वर्षे वयाचे झाड २५ किलोपर्यंत उत्पादन देते. त्यास किलोला ८० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळतो. उत्पादित मालाची पुणे गुलटेकडी येथील व्यापाऱ्यांना विक्री केली जाते.

सक्रिय गट
गावात विविध योजना राबविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आत्मा अंतर्गत श्रीराम समूह शेतकरी गटाची स्थापना झाली आहे. यात वीस शेतकऱ्यांचा सहभाग आहे. यात काळेही सहभागी झाले आहेत. गटाच्या माध्यमातून माती परिक्षण, फळप्रक्रिया, सेंद्रिय शेती, गांडूळ खते अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मिळते.

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल
दोन वर्षांपूर्वी पॅकहाऊसची उभारणी केली आहे. गावात शेतकरी गटामार्फत प्रक्रिया उद्योग सुरू झाला आहे. काळे देखील त्याचा लाभ घेतात. त्यांनी आपल्या आंब्यावर प्रक्रिया करून तीन टन पल्प निर्मिती केली. सीताफळापासून १३ टन गर उत्पादित करून १० टनांपर्यंत विक्री केली. विविध कार्यक्रम व लग्न समारंभांमध्ये त्यासाठी ऑर्डर मिळाली आहे.

रोपविक्रीतून उत्पन्न
फळबाग उत्पादनात चांगला जम बसविल्याने परिसरातून फळांच्या रोपांविषयी काळे यांच्याकडे विचारणा होते. काळे यांनी ही संधी हेरून पेरू, सीताफळ, अंजीर रोपांची विक्री सुरू केली आहे. प्रति रोप पेरू ८० ते १०० रू, सीताफळ ३० रुपये, अंजीर ४० रुपये या प्रमाणे विक्री होते. वर्षभरात १० ते १५ हजार रोपांचा खप होतो.

संपर्क- देवराम काळे- ९६८९५२९५७५


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...